Pushpa Part 3: 'पुष्पा: द रूल'नंतर निर्माते घेऊन येणार तिसरा भाग! अल्लू अर्जुनचा मोठा खुलासा

Allu Arjun Pushpa 3 Movie : अल्लू अर्जुननं एका कार्यक्रमात हा खुलासा केला आहे. 

दिक्षा पाटील | Updated: Feb 18, 2024, 11:39 AM IST
Pushpa Part 3: 'पुष्पा: द रूल'नंतर निर्माते घेऊन येणार तिसरा भाग! अल्लू अर्जुनचा मोठा खुलासा  title=
(Photo Credit : Social Media)

Allu Arjun Pushpa 3 Movie : लोकप्रिय दाक्षिणात्य अभिनेता अल्लू अर्जुनचा 'पुष्पा 2' हा चित्रपट या वर्षी प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट 15 ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे. आता चित्रपटाचं शूटिंग पूर्ण झालेली नाही. सध्या अल्लू अर्जुननं Berlin Film Festival 2024 मध्ये भारताचं प्रतिनिधित्व केलं. तिथे त्यानं ‘पुष्पा’ च्या सीक्वेलविषयी वक्तव्य केलं आहे. जवळपास त्यांनं या बातमीला दुजोरा दिला आहे. तर या चित्रपटाचा तिसरा पार्ट देखील येण्याची शक्यता आहे. याविषयी त्यानं नक्की काय सांगितलं ते जाणून घेऊया. 

या कार्यक्रमाक अल्लू अर्जुननं सांगितलं की तुम्ही नक्कीच पुष्पाच्या तिसऱ्या भागाची अपेक्षा ठेवू शकता. आम्हाला या चित्रपटाची एक फ्रेंचायझी बनवायची आहे आणि त्यासाठी आम्ही काही योजना देखील केल्या आहेत. अल्लू अर्जुनच्या या वक्तव्यानंतर चाहत्यांमध्ये चित्रपटाविषयी उत्सुकता वाढली आहे. चाहत्यांनी हे जाणून घेण्यासाठी आतुर आहेत की दिग्दर्शक सुकुमार हे या फ्रेंचायझीची पटकथा कशी पुढे घेऊन येतील. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

लक्षवेधी गोष्ट म्हणजे 'पुष्पा : द राइज' या चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारणारा अभिनेता फहद फासिल देखील तिसऱ्या भागात दिसण्याची शक्यता आहे. एका मुलाखतीत फहदनं म्हटलं होतं की जेव्हा सुकुमारनं पहिल्यांदा स्क्रिप्ट ऐकवली होती. तेव्हा हा फक्त एक चित्रपट होता. मात्र, पुष्पा बनवताना आमच्याजवळ इतक्या गोष्टी एकत्र आल्या की चित्रपट दोन भागात बनवावी लागते. फहदनं हे देखील म्हटलं की सुकुमारकडे ही फ्रेंचायजी बनवण्यासाठी खूप ऑप्शन आहेत. 

हेही वाचा : 'दंगल' अभिनेत्री सुहानी भटनागरची अखेरची इच्छा राहिली अपूर्ण

लक्षवेधी गोष्ट म्हणजे अल्लू अर्जून गेल्या काही दिवसांपासून दुसऱ्या भागाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. 'पुष्पा: द रूल' मध्ये अल्लू अर्जुन आणि फहद फासिल आता 'भंवर सिंह शेखावत' या भूमिकेतून पुन्हा एकदा आपल्याशी मोठ्या पडद्यावर भेटायला येणार आहे. या चित्रपटात रश्मिका मंदाना, सुनील, अनसूया सारखे अनेक कलाकार दिसणार आहेत. हा चित्रपट संपूर्ण जगात 15 ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे. सध्या या चित्रपटाच्या संपूर्ण टीमला शूटिंग वेळेत संपवायचे आहे. जेणेकरून दिलेल्या वेळेत चित्रपट प्रदर्शित होईल. या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेनं प्रतिक्षा करत आहेत.