घटस्फोटानंतर समांथानं मिटवली लग्नाची निशाणी, वेडिंग ड्रेसची केली अशी अवस्था

Samantha Ruth Prabhu : समांथा रुथ प्रभूनं नुकत्याच शेअर केलेल्या व्हिडीओला पाहून तिच्या चाहत्यांनी लगेच हा अंदाज बांधला आहे. 

दिक्षा पाटील | Updated: Apr 26, 2024, 04:09 PM IST
घटस्फोटानंतर समांथानं मिटवली लग्नाची निशाणी, वेडिंग ड्रेसची केली अशी अवस्था title=
(Photo Credit : Social Media)

Samantha Ruth Prabhu : दाक्षिणात्य अभिनेत्री समांथा रुथ प्रभू ही तिच्या खासगी आयुष्यामुळे सतत चर्चेत असते. 2017 मध्ये समांथा आणि नागा चैतन्य यांनी लग्न केलं होतं. मात्र, त्यांचं हे नातं 4 वर्ष देखील नाही टिकलं. समांथा आणि नागा चैतन्य यांच्या चाहत्यांना त्यांच्या घटस्फोटानं मोठा धक्का बसला होता. त्यात आता समांथानं तिच्या लग्नाच्या कपड्यांसोबत असं काही केलं की ज्यांन सगळ्यांना आश्चर्य झालं आहे.

समांथा रुथ प्रभूनं तिच्या लग्नाच्या शेवटच्या निशाणीचं काय केलं हे जाणून घेण्याची सगळ्यांची इच्छा आहे. अशात आता त्याचा एक व्हिडीओ समोर आलाय. समांथानं नागा चैतन्यसोबतच्या ख्रिश्चन वेडिंगमध्ये जो ड्रेस परिधान केला होता. त्याची आठवण कायम स्वरुपी मिटवून टाकण्यासाठी तिनं त्यातून एक नवा ड्रेस तयार केला आहे. त्याचा हा व्हिडीओ आता समोर आला आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

समांथाच्या या ड्रेसला फॅशन डिझायनर क्रेशा बजाजनं नवा लूक दिला आहे. एका अवॉर्ड फंक्शनसाठी डिझायनरनं समांथाच्या वेडिंग ड्रेसपासून एक क्लासी आणि एलिगेंट ड्रेस तयार केला आहे. क्रेशानं एक व्हिडीओ तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. यात ते एका पांढऱ्या वेडिंग ड्रेसपासून एक काळ्या रंगाचा स्ट्रॅपलेस आउटफिट तयार करताना दिसत आहे. त्याशिवाय समांथानं या ड्रेसमध्ये काही फोटो देखील शेअर केले आहेत. हे फोटो शेअर करत समांथानं कॅप्शन दिलं की आज "मी जो ड्रेस परिधान केला होता, तो माझ्या हृदयाशी जोडलेला आहे. हा ड्रेस क्रेशा बजाजनं बनवला आहे. खरंतर, काही लोकांना वाटतं असेल की याचं काही महत्त्व नाही. तर मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचं आहे की तुमच्या जुन्या कपड्यांना पुन्हा एकदा एका वेगळ्या प्रकारे वापरायला काढणं, याचा अर्थ असा आहे की तुम्ही तुमच्या सवयी बदलत आहात आणि तुमची लाइफस्टाइलला आणखी जास्त टिकाऊ बनवत आहात. प्रत्येक छोटा बदल महत्त्वाचा आहे." 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

हेही वाचा : वडील ऋषी कपूर यांचा अखेरचा फोन उचलला नाही याचा अजुनही पश्चाताप; 'आजही फोनमध्ये...'

दरम्यान, 2017 मध्ये समांथा रुथ प्रभूनं नागा चैतन्यशी गोवामध्ये दाक्षिणात्य आणि ख्रिश्चन पद्धतीनं लग्न केलं होतं. ख्रिश्चन लग्नात समांथानं ऑफ-शोल्डर ड्रेस परिधान केला होता आणि दाक्षिणात्य पद्धतीनं केलेल्या लग्नात तिनं कांजीवरम साडी नेसली होती. तर ते दोघं ऑक्टोबर 2021 मध्ये विभक्त झाले.