Sidharth Shuklaसाठी Shehnaaz चे 'ते' शेवटचे शब्द ऐकून तुमचेही डोळे पाणावतील

सिद्धार्थच्या मृत्यूनंतर शहनाजची प्रकृती खूपच वाईट झाली आहे.

Updated: Sep 6, 2021, 05:01 PM IST
Sidharth Shuklaसाठी Shehnaaz चे 'ते' शेवटचे शब्द ऐकून तुमचेही डोळे पाणावतील title=

मुंबई : प्रसिद्ध टीव्ही अभिनेता सिद्धार्थ शुक्ला याचे गुरुवारी 2 सप्टेंबर रोजी वयाच्या 40 व्या वर्षी निधन झाले. हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगितले जाते. सिद्धार्थच्या आचानक जाण्याने टीव्ही इंडस्ट्रीमध्ये शोककळा पसरली आहे. प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने आपल्या आवडत्या स्टारला श्रद्धांजली देत आहेत. दरम्यान, सिद्धार्थच्या अंत यात्रेला गेलेल्या अभिनेत्री संभावना सेठने शहनाज गिलबाबत मोठा खुलासा केला आहे.

एका मुलाखतीदरम्यान, संभावनाने सांगितले की, सिद्धार्थच्या मृत्यूनंतर शहनाजची प्रकृती खूपच वाईट झाली आहे. ती वारंवार सिद्धार्थचेच नाव घेत आहे. सिद्धार्थच्या अंत्यसंस्कारापूर्वी शहनाज म्हणाली 'सिद्धार्थ मेरा बच्चा'. सिद्धार्थच्या जाण्याने शहनाज पूर्णपणे तुटलेली आहे आणि ती रडून रडून तिने स्वत:ची वाईट अवस्था करुन घेतली आहे. सांभवाने सांगितले की, सिद्धार्थच्या अंत्यसंस्काराच्या वेळी शहनाज गुडघ्यावर खाली बसली आणि जोरजोरात रडू लागली.

या वाईट काळातून बाहेर पडण्यासाठी शहनाजला  बराच वेळ लागेल, असे संभावनाने सांगितले. ती म्हणाली की, टीव्हीचा प्रत्येक तारा ओल्या डोळ्यांनी सिद्धार्थला श्रद्धांजली अर्पण करत आहे.

शुक्रवारी शहनाज जड अंतःकरणाने सिद्धार्थच्या शेवटच्या प्रवासात सामील झाली. त्याचवेळी सिद्धार्थच्या आईची सुद्धा अवस्था झाली होती. सिद्धार्थच्या अंत्यसंस्कारापूर्वी शहनाज गिल सिद्धार्थकडेच टक लावून बघत बसली, जणू काही तिला वाटत होते की, सिद्धार्थ आता उठेल आणि तिच्यासोबत बोलेल. त्याचबरोबर सिद्धार्थच्या मृत्यूनंतर शहनाज कोणाशीही बोलण्याच्या स्थितीत नाही.