मलायकासोबत ब्रेकअपनंतर 'या' लोकप्रिय इन्फ्लूएन्सरच्या प्रेमात अर्जुन कपूर? ती म्हणते...

Arjun Kapoor Dating : अर्जुन कपूरचा मलायका अरोरासोबत ब्रेक झाल्याच्या चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरु होत्या. त्यात आता अर्जुन एका सोशल मीडिया इन्फ्लूएन्सर आणि अभिनेत्रीला डेट करत असल्याच्या चर्चा सुरु असताना तिनं आता यावर प्रतिक्रिया दिली आहे.  

दिक्षा पाटील | Updated: Aug 25, 2023, 01:41 PM IST
मलायकासोबत ब्रेकअपनंतर 'या' लोकप्रिय इन्फ्लूएन्सरच्या प्रेमात अर्जुन कपूर? ती म्हणते... title=
(Photo Credit : Respective Celebrity Instagram)

Kusha Kapila on Rumours Dating Arjun Kapoor : बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूर आणि अभिनेत्री मलायका अरोरा हे त्यांच्या रिलेशनशिपमुळे चर्चेत असतात. त्या दोघांनमध्ये असलेला वयाचा फरक हा कायम स्वरूपी प्रेक्षकांमध्ये चर्चेचा विषय ठरतो. नेहमीच वेगवेगळ्या कारणांमुळे आणि सोशल मीडियावर शेअर केलेल्या त्यांच्या नेहमीच चर्चेत राहतात. मात्र, यावेळी ते चर्चेत राहण्याचं कारण म्हणजे त्यांच्या ब्रेकअपच्या चर्चा आहेत. हे प्रकरण फक्त इथेच थांबलं नाही तर पुढे अर्जुन कपूरचं नाव हे सोशल मीडियावर इन्फ्लूएन्सर आणि अभिनेत्री कुशा कपिलाशी जोडण्यात आले आहे. त्यावर आता कुशा कपिलानं या संपूर्ण प्रकरणावर मौन सोडलं आहे. 

अर्जुनला डेट करत असण्याच्या बातम्यांवर आता कुशानं प्रतिक्रिया दिली आहे. या सगळ्या व्हायरल होत असलेल्या चर्चांवर कमेंट करत कुशा म्हणाली, 'माझ्याविषयी दररोज इतका मूर्खपणाच्या गोष्टी वाचल्यानंतर, मला माझा स्वतःची ओळख करून द्यावी लागते. मी नेहमीच माझ्याबद्दल अशा चुकीच्या गोष्टी पाहिल्या आहेत. मी फक्त प्रार्थना करतो की माझ्या आईने हे सर्व वाचू नये. नाहीतर तिच्या सोशल लाइफला खूप मोठा धक्का बसेल.'

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

अर्जुन आणि कुशाच्या रिलेशनशिपच्या चर्चेचे कारण करण जोहर!

अर्जुन आणि कुशा हे दोघे नुकतेच करण जोहरच्या घरी एका गेट-टूगेदरमध्ये स्पॉट झाले. यावेळी कुशासोबत अनेक सोशल मीडिया इन्फ्लूएन्सर होते. पण यावेळी फक्त अर्जुन तिथे दिसला आणि त्याच्यासोबत मलायका अरोरा दिसली नाही. त्यामुळे सोशल मीडियावर त्यांचा ब्रेकअप झाला की काय अशी चर्चा सुरु होऊ लागली. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

कशी झाली होती अर्जुन आणि मलायकाच्या ब्रेकअपची चर्चा?

काही दिवसांपूर्वी अर्जुननं त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून त्याच्या सोलो ट्रिपचे फोटो शेअर केले होते. त्यानंतर त्यानं पुन्हा एकदा विकेंडचे फोटो शेअर केले होते. त्या फोटोंना शेअर करत त्यानं कॅप्शन दिलं होतं की 'आयुष्य लहान आहे. तुमचे वीकेंड्स दीर्घ बनवा'. मात्र, या सगळ्या चर्चा सुरु असताना अर्जुन किंवा मलायकानं यावर काहीही वक्तव्य केलेलं नाही. 

after breakup with malaika arora arjun kapoor is dating kusha kapila actress gets angry

मलायका आणि अर्जुनच्या रिलेशनशिपविषयी बोलायचे झाले तर अरबाज खानसोबत घटस्फोट घेतल्यानंतर मलायका ही अर्जुनसोबत रिलेशनशिपमध्ये आली होती. अनेक वर्षे रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर अखेर त्यांनी सोशल मीडियावर फोटो शेअर करत त्यांच्या रिलेशनशिपची कबूली दिली होती. ते दोघे नेहमीच एकमेकांसोबत रोमॅन्टिक फोटो शेअर करताना दिसतात.