''लहानपणी पेनाची शाई तोंडात जायची तेव्हा...'', निळी लिपस्टिक लावल्यानं उर्वशी रौतेला ट्रोल

Urvashi Rautela Blue Lipstick: यावेळी कान्स चित्रपटात उर्वशी रौतेलानं हजेरी लावली होती. तिच्या लुकनं चाहते घायाळ झाले होते. सध्या तिच्या निळ्या रंगाच्या लिपस्टिकवरून (Urvashi Rautela Troll) तिला ट्रोल केलं आहे. तिला यावेळी ऐश्वर्याचा लुकही कम्पेअर करण्यात आला आहे. 

गायत्री हसबनीस | Updated: May 19, 2023, 01:42 PM IST
''लहानपणी पेनाची शाई तोंडात जायची तेव्हा...'', निळी लिपस्टिक लावल्यानं उर्वशी रौतेला ट्रोल title=
(Photo : Urvashi Rautela| Instagram)

Urvashi Rautela Blue Lipstick: कान्स चित्रपट महोत्सवात अभिनेत्री उर्वशी रौतेला हिनं हजेरी लावली होती. तिच्या लुकनं सर्वच चाहते घायाळ (Cannes Film Festival 2023) झाले आहेत. यावेळी तिचा लुक हा फारच हटके आणि वेगळा होता. पहिल्याच दिवशी घातलेल्या तिच्या गुलाबी ड्रेसनं (Cannes Urvashi Rautela_ उपस्थितांची मनं जिंकली होती. तिच्या मगरीच्या नेकलेसची फारच चर्चा झाली होती. यावेळी तिचा लुक हा काही चाहत्यांना मात्र रूचला नव्हता आणि त्यांनी तिला ट्रोलही करायला सुरूवात केली होती. तिचा नेकलेस नक्की कशाचा आहे हेही कुणालाच कळलाय मार्ग नव्हता.

काहींना यावरूनही तिला ट्रोल केलं आहे. सध्या आता तिच्या वेगळ्याच लुकची चर्चा आहे. यावेळी तिनं ऐश्वर्या रॉयची कॉपी (Urvashi Copy Aishwarya Cannes) केली आहे असं नेटकऱ्यांचे म्हणणे आहे. 2017 साली बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन हिचा एक लुक व्हायरल झाला होता. यावेळी तिनं व्हाईट आणि जांभळ्या-हिरव्या रंगाच्या डिझाईनचा ड्रेस परिधान केला होता. हा गाऊन ऑफ शोल्डर होता व अत्यंत महागडा होता यावेळी तिच्या लुकनं चाहत्यांच्या तिच्या प्रेमात पडायला भाग पाडलं होतं.

परंतु तिच्या लुकपेक्षा सगळ्याअधिक चर्चा झाली ती म्हणजे तिच्या लिपस्टिकची. तिनं यावेळी जांभळ्या रंगाची लिपस्टिक (Blue Lipstick) लावली होती. त्यावरून ऐश्वर्या प्रचंड ट्रोल झाली होती. तिच्या या लुकवर अनेकांनी खिल्ली उडवली होती. तिच्या या लुकवर अनेकांनी मीम्सही तयार केले होते. 

डोरेमॉनच्या बहिणीपासून ते पेनाची शाई...

यावेळी पक्षांच्या पिसांप्रमाणे तिचा ड्रेस दिसत होता. गिधाड्याच्या लुकप्रमाणे तिचा हा ड्रेस होता. यावेळी निळ्या कलरच्या या ड्रेसवर तिनं मॅचिंग लिपस्टिक लावली होती. निळ्या रंगाची लिपस्टिक लावल्यानं यावेळी तिला ट्रोलर्सनी प्रचंड ट्रोल केलं आहे. अनेक ट्रोलर्सनी म्हटलं आहे की, ''ही तर डोरेमॉनची बहिण वाटते आहे.'' तर दुसऱ्या एकानं लिहिलंय की, ''जेव्हा मी पेनाची शाई बदलायला जायचो तेव्हा माझ्या तोंडात शाई जायची. तोंडात पेनाची शाई जायची तेव्हा माझं तोंड असं दिसायचं.'' असे एका नेटकऱ्यानं म्हटलं आहे. तर एकानं म्हटलंय की ''जरा जास्त लाऊड मेकअप झालाय असं नाही वाटतं?'' 

हेही वाचा - महाराष्ट्र ते फ्रान्स! Cannes चित्रपट महोत्सवात मृणाल ठाकूरचा 'हुडेड' लुक पाहिलात का?

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

ऐश्वर्याशी तुलना? 

वर म्हटल्याप्रमाणे ऐश्वर्यानंही यापुर्वी जांभळ्या रंगाची लिपस्टिक लावली होती आणि त्यावरून तीही प्रचंड ट्रोल झाली होती. तिच्यावर तर मीम्सही बनू लागले होते. त्यामुळे उर्वशीचा हा लुक पाहून यावेळी नेटकऱ्यांना ऐश्वर्याच्या त्या लुकचीही आठवण झाली आहे. अनेकांना तिच्या या लुकची आठवण होताच समोर साक्षात उर्वशीचा हा लुक पाहून नेटकऱ्यांनी तिची आणि ऐश्वर्याची तुलना केली आहे.