महाराष्ट्र ते फ्रान्स! Cannes चित्रपट महोत्सवात मृणाल ठाकूरचा 'हुडेड' लुक पाहिलात का?

Mrunal Thakur at Cannes 2023: अभिनेत्री मृणाल ठाकूर हिनं यावेळी कान्स चित्रपट महोत्सवात (Cannes Film Festival 2023) पहिल्यांदाच हजेरी लावली होती. परंतु यावेळी तिचा कॉन्फिडन्स आणि तिचा लुक पाहून चाहत्यांची तिनं मनं जिंकली आहेत. सध्या तिचा 'हुडेड' (Hooded) लुक सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. 

गायत्री हसबनीस | Updated: May 19, 2023, 12:45 PM IST
महाराष्ट्र ते फ्रान्स! Cannes चित्रपट महोत्सवात मृणाल ठाकूरचा 'हुडेड' लुक पाहिलात का? title=
(Photo: Mrunal Thakur | Instagram)

Mrunal Thakur at Cannes 2023: कान्स चित्रपट महोत्सवाला सुरूवात झाली आहे. आज या महोत्सवाचा शेवटचा दिवस आहे. तेव्हा यावेळी भारतीय सेलिब्रेटींनीही हजेरी (Indian Celebs at Cannes 2023) लावली होती. ईशा गुप्ता, मानुषी छिल्लर, ऐश्वर्या राय बच्चन अशा सेलिब्रेटींनी यावेळी कान्स महोत्सवात हजेरी लावली होती. सर्वांच्या लुक्सनं उपस्थितांची मनं जिंकून घेतली होती. यावेळी मराठमोळ्या अभिनेत्रीनं कान्स चित्रपट महोत्सवाला हजेरी लावली होती. यावेळी सगळ्यांचे लक्ष तिच्यावरच खिळले होते. या अभिनेत्रीचे नावं आहे मृणाल ठाकूर (Mrunal Thakur).

शाहिद कपूरसोबत 'जर्सी' आणि फरान अख्तरसोबत 'तूफान' या चित्रपटांतून तिनं बॉलिवूड गाजवलं आहे. हृतिक रोशनच्या 'सुपर 30' या चित्रपटातून तिनं बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. यावेळी कान्स चित्रपट महोत्सवात तिनं पहिल्यांदाच हजेरी लावली होती. (actress mrunal thakur couture look from cannes goes viral on instagram entertainment news marathi)

मृणाल ठाकूर हिनं हुडी लुकचा कुटोर ड्रेस (Couture) परिधान केला होता. यावेळी तिनं सुप्रसिद्ध फॅशन डिझायनर अनामिका खन्ना (Anamika Khanna) हिचा ड्रेस परिधान केला होता. तिच्या या लुकवर सगळ्यांच्याच नजरा खिळल्या होत्या. या ड्रेसवरील डिटेलिंग अत्यंत सुरेख होते. या फोटोवर सोनम कपूरनं कमेंट केली आहे. हुडीचा लुक तिला पसंत पडल्याचे तिनं या कमेंटमध्ये लिहिलं आहे. काही नेटकऱ्यांनाही तिचा हा लुक आवडला नसल्याचे सांगितले आहे. सोनम कपूरच्या (Sonam Kapoor) कमेंटलाच रिप्लाय देत नेटकऱ्यांनी तिच्या कमेंटवर असमर्थन दर्शवलं आहे. 

व्हाईट ड्रेसमध्ये खुललं रेड कार्पेटवरील सौंदर्य 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

यावेळी फॅशन डिझायनर फाल्गुनी शेन पिकॉक यांच्या कलेक्शनमधील व्हाईट गाऊन मृणालनं परिधान केला होता. फाल्गुनी पिकॉक आणि शेन पिकॉक या दोघांचा हा ब्रॅण्ड आहे. फाल्गुनी पिकॉक हे फॅशन इंडस्ट्रीतील मोठं नावं आहे. अभिनेत्री प्रियांका चोप्रा, प्रिती झिंटाचीही ती एक खास मैत्रीण आहे. त्याचसोबत अनेक मोठमोठ्या बॉलिवूडच्या कलाकारांना तिनं नटवलं सजवलं आहे. सध्या कान्सच्या रेड कार्पेटवर मृणाल ठाकूरनं (Falguni Shane Peacock) फाल्गुनी पिकॉकनं बनवलेला ड्रेस घातला आहे. मृणालचा हा पहिलाच कान्स चित्रपटातला अनुभव होता यावेळी तिचा आत्मविश्वातला रेड कार्पेटवरील वॉक पाहून चाहत्यांची मनं जिंकली. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

हेही वाचा - 'बहरला हा मधुमास' गाण्यानंतर आफ्रिकन युट्यूबर्सचा 'या' गाण्यावर Video, सोशल मीडियावर धुमाकूळ

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

साडीतला पेहेराव 

यावेळी मृणाल ठाकूरचं साडीतलं सौंदर्यही खुलून दिसतं होतं. ही साडीदेखील फाल्गुनी पिकॉक यांनी तयार केली होती. यावेळी तिचा शिमर साडीतला लुक पाहून चाहते घायाळ झाले होते. कान्सच्या पहिल्या दिवशी तिनं मोनोकिनी स्टाईल्सचा लुक परिधान केला होता. तिच्या या लुकचीही बरीच चर्चा झाली होती. त्यामुळे तिचा हा लुकही व्हायरल होयला जास्त (Mrunal Thakur Monokini Look) वेळ लागला नाही.