धक्कादायक : प्रसिद्ध अभिनेत्रीची वयाच्या 20 व्या वर्षी आत्महत्या

अभिनेत्रीने वयाच्या 20 व्या वर्षी आत्महत्या केली आहे.

Updated: May 15, 2022, 08:11 PM IST
धक्कादायक : प्रसिद्ध अभिनेत्रीची वयाच्या 20 व्या वर्षी आत्महत्या  title=

मुंबई : 'मन माने ना' या टीव्ही शोमध्ये मुख्य भूमिका साकारणारी बंगाली अभिनेत्री पल्लवी डे कोलकाता येथील गरफा येथील तिच्या फ्लॅटमध्ये मृतावस्थेत आढळून आली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तरुण अभिनेत्रीने वयाच्या 20 व्या वर्षी आत्महत्या केली आहे.

पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत
रिपोर्ट्सनुसार, ती पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळल्याचं सांगण्यात येत आहे. यानंतर पल्लवीला तात्काळ बांगूर रुग्णालयात नेण्यात आलं असता तिला मृत घोषित करण्यात आलं. पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून अभिनेत्रीने असं पाऊल का उचललं याचा शोध घेत आहेत. तिचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला आहे. पल्लवीच्या मृत्यूच्या बातमीने तिच्या चाहत्यांना धक्का बसला आहे.

दोन दिवसांआधी केलं शूटिंग
'मन माने ना' या मालिकेत मध्ये काम केलेली तिची सहकलाकार अनमित्रा बताब्याल या बातमीने धक्का बसला आहे. दोन दिवसांआधी तिने पल्लवीसोबत शूटिंग केलं होतं. ती म्हणाली, "मला खूप मोठा धक्का बसला आहे.

आम्ही 12 मे रोजी टेलिव्हिजन शोसाठी शूटिंग केलं आणि नंतर तिच्याशी गप्पा पण मारल्या. माझा अजूनही या बातमीवर विश्वास बसत नाहीये. टीमच्या आणखी एका सदस्याने सांगितलं की, ''ती दोन दिवसांपूर्वी शूटमध्ये सामील झाली होती आणि आम्हाला माहित नाही की ती दु: खी आहे की नाराज आहे. माझा अजूनही विश्वास बसत नाही की ती आमच्यात नाही आहे."

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

'रेशम झंपी' या टेलिव्हिजन मालिकेत महत्त्वाची भूमिका साकारून पल्लवी घराघरात पोहचली होती. ती टीव्ही प्रोजेक्ट 'अमी सिराजेर बेगम'मध्येही झळकली आहे. ज्यामध्ये सीन बॅनर्जी मुख्य भूमिकेत होते. हा शो काही काळ चालला असला तरी, पल्लवी आणि सीन यांनी पीरियड पीसची मुख्य जोडी म्हणून चांगला चाहता वर्ग मिळवला.