कलाविश्वात अत्महत्येचं सत्र सुरुच..., आणखी एका 18 वर्षीय अभिनेत्रीने संपवलं जीवन

आयुष्य एवढं स्वस्त.... आजीसाठी ती भयान रात्र... 18 वर्षीय अभिनेत्रीने घेतला अखेरचा श्वास  

Updated: May 30, 2022, 11:52 AM IST
कलाविश्वात अत्महत्येचं सत्र सुरुच..., आणखी एका 18 वर्षीय अभिनेत्रीने संपवलं जीवन title=

मुंबई : सध्या कलाविश्वात आत्महत्येचं सत्र सुरू आहे. काही दिवसांपूर्वी तीन अभिनेत्रींनी गळफास घाऊन स्वतःचं जीवन संपवलं. या अभिनेत्रींच्या आत्महत्येचं रहस्य उलगडलं नसताना आणखी एका उभरत्या अभिनेत्रीने जगाचा अखेरचा निरोप घेतला. रिपोर्टनुसार, 18 वर्षीय मॉडेलने गळफास घेऊन आपलं जीवन संपवलं आहे. मॉडेलचे नाव सरस्वती दास असल्याचे सांगण्यात येत आहे. प्रकरण कोलकात्यातील कसबा भागातील आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी सरस्वतीने तिच्या खोलीत पंख्याला गळफास लावून आत्महत्या केली. रात्री 2 वाजता सरस्वतीच्या आजींनी अभिनेत्रीला पंख्याला लटकलेल्या अवस्थेत पाहिलं. त्यानंतर आजी तत्काळ नातीला खाली उतरवून सरकारी रुग्णालयात दाखल केलं.

रुग्णालयात दाखल करताचं डॉक्टरांनी सरस्वतीला मृत घोषित केलं. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 'सरस्वती रात्री आजीच्या बाजूला झोपली होती. रात्री 2 वाजता आजीला नात दिसली नाही म्हणून, तिला पाहायला दुसऱ्या खोलीत गेल्यासं... आजीला अभिनेत्री पंख्याला लटकलेली दिसली.'

डिप्रेशनमध्ये होती सरस्वती...
कोलकाता पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 'सरस्वती गेल्या 17 वर्षांपासून तिच्या आई आणि मामासोबत राहत होती, कारण मॉडेलची आई-वडील विभक्त झाले होते. दहावीनंतर सरस्वतीने शिक्षण सोडले. यानंतर तिने ट्यूशन शिकवायला सुरुवात केली, शिवाय ती मॉडेलिंगमध्ये करिअर करत होती. 

एवढंच नाही तर सरस्वती बॉयफ्रेंडमुळे डिप्रेशनमध्ये असल्याचंसमोर आलं आहे. कारण मृत्यू पूर्वी रात्री 1 वाजेपर्यंत सरस्वती बॉयफ्रेंडसोबत बोलत होती. पोलिसांनी सरस्वतीचा मोबाईल ताब्यात घेतला आहे. सध्या याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे.