अभिनेत्रीमध्ये बाथरुममध्ये अंघोळ करायला गेली की...? Viral Video पाहून हैराण होतायत नेटकरी

जर या सुखसोई आपण पहिल्यांदाच पाहत असू, तर ही प्रतिक्रिया हमखास येतेच. 

Updated: Mar 16, 2022, 11:16 AM IST
अभिनेत्रीमध्ये बाथरुममध्ये अंघोळ करायला गेली की...? Viral Video पाहून हैराण होतायत नेटकरी  title=
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई : लहानपणी चित्रपटांमधील अभिनेत्रींना बाथटबमध्ये अंघोळ करताना पाहिलं की, कसलं भारी आहे हे.... असंच आपल्या तोंडातून निघतं. म्हणजे जर या सुखसोई आपण पहिल्यांदाच पाहत असू, तर ही प्रतिक्रिया हमखास येतेच. 

पुढे जेव्हा केव्हा बाथटबमध्ये अंघोळ करण्याची संधी मिळाली तेव्हा तो आनंद आपण एकतर कोणालातरी सांगून व्यक्त केला किंवा मग त्याचा छानसा व्हिडीओ करत तो स्टेटस किंवा आणखी कुठे शेअर केला. 

म्हणजे बाथटब कसा असतो, ते बाथरुम कसं असतं हे या व्हिडीओतून सर्वांनाच सांगण्यात येतं. हा झाला तुमचा आमचा मुद्दा. पण, आता एका ओळखीच्या आणि प्रसिद्ध चेहऱ्यानंही असंच काहीसं केल्यामुळं सर्वांनाच धक्का बसला आहे. 

हा प्रसिद्ध चेहरा आहे, 'बिग बॉस' फेम मंदाना करिमी हिचा. आपल्या बोल्ड अंदाजासाठी ओळखल्या जाणाऱ्या मंदानानं नुकताच एक व्हिडीओ शेअर केला आहे. 

तिचा हा व्हिडीओ पाहताना पाहणाऱ्यांनाही हादराच बसला आहे. कारण, यामध्ये ती चक्क बाथटबमध्ये बसलेली दिसत आहे. 

पाणी आणि फोमनं भरलेल्या एका बाथबटबमध्ये मंदाना बसलेली दिसत आहे. यामध्ये ती स्पगेटी घातलेली दिसत आहे. मंदाना इथंही तिचा बोल्ड अंदाज दाखवण्यात कुठंच कमी पडलेली नाही. 

मंदानानं असा व्हिडीओ शेअर करण्याची ही पहिलीच वेळ नाही. ती याआधीही याच बोल्ड अंदाजामुळं चर्चेत आली आहे. मंदाना कायमच फिटनेस आणि तिच्या लूकवर काम करताना दिसते. 

मुद्दा असा, की ही अभिनेत्री ज्या पद्धतीनं स्वत:ला कॅरी करते ते पाहणं अनेकांच्याच आवडीचा भाग. मंदाना एक इराणी मॉडेल आहे. तिची आई इराणी आणि वडील भारतीय आहेत. 

कलाजगतात प्रवेश करण्याआधी ती एअरहॉस्टेस होती. खासगी आयुष्याबाबत सांगावं, तर मंदानाला तिच्या दोन्ही लग्नांमध्ये अपयशाचाच सामना करावा लागला होता.