लग्नानंतर समुद्र किनाऱ्यावर कचऱ्यापासून बनवलेल्या बिकिनीत दिसली कतरिना, पाहा व्हायरल फोटो

मालदीवच्या समुद्रकिनाऱ्यावर समुद्र आणि हवेचा आनंद घेत असताना कतरिनाचा एक फोटो व्हायरल होत आहे.

Updated: Jan 27, 2022, 07:43 PM IST
लग्नानंतर समुद्र किनाऱ्यावर कचऱ्यापासून बनवलेल्या बिकिनीत दिसली कतरिना, पाहा व्हायरल फोटो title=

मुंबई : बॉलीवूड अभिनेत्री कतरिना कैफ नेहमीच लूकने चाहत्यांना घायाळ करते. अभिनेत्रीच्या नवीन बीच लूककडे लोकांच्या नजरा आहेत. तसेच अभिनेत्रीची आणखी एका गोष्टीसाठी चर्चा होत आहे ती म्हणजे तिच्या बिकीनी. कारण कतरिनाची ही बिकिनी समुद्राच्या कचऱ्यापासून बनली आहे. इतका पैसा असूनही कतरिना कचऱ्यातील का बिकिनी घालते असा तिच्या चाहत्यांना प्रश्न पडला आहे.

परंतु खरेतर कतरिना एका ब्रँडच्या जाहिरातीच्या शूटिंगसाठी मालदीवमध्ये पोहोचली होती, जिथे तिने 10 हजारांची बिकिनी घातली होती, जी पूर्णपणे समुद्री कचऱ्यापासून बनलेली आहे. 

मालदीवच्या समुद्रकिनाऱ्यावर समुद्र आणि हवेचा आनंद घेत असताना, कतरिनाने निऑन-ब्लू रंगाची बिकिनी परिधान केली होती, ज्यामुळे अभिनेत्रीला खूप ट्रेंडी आणि स्मोकिंग हॉट लुक पाहायला मिळाला.

कतरिनाची बिकिनी दिल्लीस्थित रिसॉर्ट फॅशन लेबल गुआपा यांनी डिझाइन केली होती, ज्याला मायला रिव्हर्सिबल बिकिनी असे नाव देण्यात आले होते. हा एक प्रकारचा रियायकल केलेला ड्रेस आहे.

बिकिनीमध्ये क्रिस-क्रॉस डिटेलिंगसह केवळ निऑन पट्ट्या आहेत, ज्या या लूकला पूर्ण करत आहेत.

बिकिनी टॉपसह कलर-ब्लॉक बॉटम लेग कट पॅन्ट कतरिनाचे पाय हायलाइट करत आहेत. त्याच वेळी, या सेटसह कतरिनाने पांढऱ्या रंगाचा शर्ट घातला होता, ज्याची बटणे तिने उघडी ठेवली होती.

कतरिनाचा हा बीच वेअर सेट पर्यावरणीय फॅशनला चालना देत होता. खरे तर, तिचे हे रंगीत पोहण्याचे पोशाख समुद्रातून सापडलेल्या सस्टेनेगल इकोनिल यार्नपासून बनवले होते, ज्याची किंमत 10 हजार 900 रुपये आहे.