'फतेह'ची रिलीज डेट समोर, सोनू सूदने जॅकलीन फर्नांडिससोबतची दाखवली झलक

Sonu Sood’s Upcoming Movie Fateh Release Date​: सोनू सूदने 'फतेह' चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली आहे. त्याचवेळी 'औरों में कहाँ दम था' या चित्रपटातील 'ए दिल जरा' हे गाणे रिलीज करण्यात आले आहे.

सोनेश्वर पाटील | Updated: Jul 31, 2024, 03:15 PM IST
'फतेह'ची रिलीज डेट समोर, सोनू सूदने जॅकलीन फर्नांडिससोबतची दाखवली झलक  title=

Sonu Sood’s Upcoming Movie Fateh Release Date​: अभिनेता सोनू सूदने त्याच्या वाढदिवसानिमित्त 'फतेह' चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली आहे. 'फतेह' हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. अजय देवगण आणि तब्बू यांचा 'औरों में कहां दम था' हा चित्रपट 2 ऑगस्ट 2024 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटातील 'ए दिल जरा' हे नवीन गाणं रिलीज झालं आहे. 

'फतेह'ची 'या' दिवशी होणार प्रदर्शित 

अभिनेता सोनू सूदने 30 जुलै रोजी त्याचा 51 वा वाढदिवस साजरा केला. त्याने वाढदिवसानिमित्त 'फतेह' चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली आहे. 'फतेह' हा चित्रपट 10 जानेवारी 2025 रोजी प्रदर्शित होणार आहे. सोनू सूदच्या या चित्रपटात लवकरच जॅकलीन फर्नांडिस दिसणार आहे. सोनू सूद या चित्रपटाद्वारे दिग्दर्शनात पदार्पण करत आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

' औरों में कहाँ दम था' चित्रपटाचे नवीन गाणे

अभिनेता अजय देवगन आणि तब्बू यांच्या 'औरों में कहाँ दम था' या चित्रपटातील नवीन गाणं रिलीज झालं आहे. हा चित्रपट 2 ऑगस्ट 2024 रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. चित्रपटातील 'ए दिल जरा' हे नवीन गाणं रिलीज झालं असून या गाण्याने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. हे गाणे मनोज मुंतशीर यांनी लिहिले आहे. त्याचबरोबर हे गाणे अमला चेबोलू आणि ऋषभ चतुर्वेदी यांनी गायले आहे. 

ॲक्शन चित्रपट

बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस ही या ॲक्शन चित्रपटात मुख्य भूमिकेत असणार आहे. सोनू सूदचा हा दिग्दर्शकीय पदार्पण आहे. यापूर्वी सोनू सूदने या चित्रपटाचा फर्स्ट लूक शेअर केला होता. ज्याला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळाले होते. मात्र, आता चाहत्यांना चित्रपटाच्या टीझरची प्रचंड उत्सुकता लागली आहे. वैभव मिश्राच्या 'फतेह'मध्ये सोनू आणि जॅकलीन मुख्य भूमिकेत आहेत.