VIRAL VIDEO: 'हिच्यापेक्षा ढिनचॅक पूजा बरी!' जेव्हा गाण्यावरून बेक्कार ट्रोल झाली कियारा, सिद्धार्थनं केलं होतं कौतुक

Kiara Advani Singing Performance Video : कियारा अडवानीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. 

दिक्षा पाटील | Updated: Jul 31, 2024, 12:35 PM IST
VIRAL VIDEO: 'हिच्यापेक्षा ढिनचॅक पूजा बरी!' जेव्हा गाण्यावरून बेक्कार ट्रोल झाली कियारा, सिद्धार्थनं केलं होतं कौतुक title=
(Photo Credit : Social Media)

Kiara Advani Singing Performance Video : बॉलिवूड अभिनेत्री कियारा अडवाणीनं काही दिवसांपूर्वी 10 वर्षांचा कालावधी पूर्ण केला आहे. त्या निमित्तानं कियारा तिच्या चाहत्यांना भेटली होती. तर चाहत्यांशी इतर सगळ्या गोष्टींवर चर्चा करत असताना कियारानं तिच्या 'इंडियन आयडल' या शोमधील एक व्हायरल झालेल्या व्हिडीओवर वक्तव्य केलं आहे. खरंतर, इंडियन आयडलमध्ये पोहोचलेल्या कियारानं त्या शोच्या फायनलमध्ये एका स्पर्धकासाठी गाणं गायलं होतं. त्यावर सिद्धार्थ मल्होत्रा अर्थात तिच्या नवऱ्याची कशी प्रतिक्रिया होती याविषयी तिनं सांगितलं आहे. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. 

कियाराचा हा व्हिडीओ रेडिटवर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत कियारानं प्रामाणिकपणे तिला तिच्या गाण्याविषयी काय वाटलं ते सांगितलं आहे. या व्हिडीओच्या सुरुवातीला कियारा स्वत:चा इंडियन आयडलच्या फायलनमध्ये स्टेजवरील तिच्या परफॉर्मन्सला पाहते. तर ते पाहताना कियारा म्हणाली, "हे फार वाईट होतं, त्यानंतर मी नाहीच... त्यावर तिथे उपस्थित असलेला तिचा चाहता म्हणाला, नाही, नाही, ते वाईट नव्हतं, तू खूप सुंदर गायलंस. तर चाहत्याच्या प्रतिक्रियेवर कियारा म्हणाली, धन्यवाद, तुम्ही खरंच माझे खरे चाहते आहात. पुढे तिच्या परफॉर्मन्सविषयी बोलताना कियारा म्हणाली, मी गाणं गायल्यानंतर सिद्धार्थ म्हणाला, तुझ्यात खरंच खूप हिंम्मत आहे गं. ग्रॅन्ड फिनालेमध्ये गाण्याची हिंम्मत केलीस तू... अचानक माझे सुर घसरले... पण मला ते जाणवलं. खरंतर, तुम्ही ते मनापासून करतात हे त्यासाठी महत्त्वाचं असतं."

हेही वाचा : आलिया आणि नीतू कपूरही सासू-सूनेप्रमाणे भांडतात? रणबीर कपूरचा खुलासा, 'त्या इतक्या...'

Kiara talks about her trolled Indian idol performance in her latest fanmeet event
byu/Dazzling_Complex5897 inBollyBlindsNGossip

कियाराचा हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी तिची स्तुती केली आहे. तर काहींनी कियाराला ट्रोल केलं आहे. एक नेटकरी म्हणाला, 'हिच्यापेक्षा ढिनचॅक पूजा बरी!' उटलं जे तिला ट्रोल करत होते त्यांना सडेतोड उत्तर दिले आहे. कियाराच्या कामाविषयी बोलायचं झालं तर फुगली या चित्रपटातून तिनं बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. मात्र, तिला खरी लोकप्रियता ही 'MS Dhoni - The Untold Story' या चित्रपटातून मिळाली. लवकरच ती राम चरणसोबत दिसणार आहे. तर त्याशिवाय तिच्याकडे 'वॉर 2' या चित्रपटात दिसणार आहे. त्यात हृतिक रोशन आणि ज्युनियर एनटीआर दिसणार आहेत. दरम्यान, आज 31 जुलै रोजी कियारा अडवानीचा 33 वा वाढदिवस आहे.