मुंबई : बॉलिवूडमध्ये सध्या जुनी गाणी रिक्रिएट करण्याचा नवा ट्रेंड सुरु आहे, हे तर प्रत्येकाला ठाऊकच आहे. काही दिवसांपूर्वी 'बाटला हाउस' चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला. चित्रपटाच्या ट्रेलरला चाहत्यांची चांगलीच पसंती मिळाली. या चित्रपटातील 'साकी साकी' गाण्यावर अभिनेत्री नोरा फतेही थिरकताना दिसत आहे. गतवर्षी ‘सत्यमेव जयते’ या चित्रपटात ‘दिलबर दिलबर’ हे गाणे रिक्रिएट केले होते. या गाण्यातील नोराच्या अदांनी चाहत्यांना चांगलेच घायाळ केले होते. ‘ओ साकी साकी’चे नवे व्हर्जन सिंगर नेहा कक्करच्या आवाजात रिक्रिएट करण्यात आले आहे.
'साकी साकी' च्या रिक्रिएट गाण्यावर अभिनेत्री कोएना मित्राने मात्र नाराजी व्यक्त केली आहे. 'साकी साकी' गाण्याचे रिक्रिएट व्हर्जन आपल्या अजिबात आवडले नसल्याचे तिने सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगीतले आहे. साकी साकी या गाण्याला गायक सुनिधी, सुखविंदर, विशाल-शेखर यांनी आवाज दिला होता. त्याकाळच्या या गाण्याला चाहत्यांनी चांगलेच डोक्यावर घेतले होते. कोएना मित्राने बॉलिवूडला कधीच रामराम ठोकला आहे.
My song from Musafir #Saaki Saaki" has been recreated.
Sunidhi, Suhwinder, Vishal, Shekhar combination was outstanding. Didn't like the new version, it's a mess This song had crashed many blockbusters! Why batlahouse, why?
P. S: Nora is a stunner. Hope she saves our pride.— Koena Mitra (@koenamitra) July 13, 2019
'बाटला हाऊस'मध्ये जॉन अब्राहमसह मृणाल ठाकूर प्रमुख भूमिका साकारणार आहे. याशिवाय रवि किशन, प्रकाश राज, मनीष चौधरीही चित्रपटात झळकणार आहेत. या चित्रपटाचं शूटिंग दिल्ली, मुंबई, जयपूर आणि नेपाळमध्ये करण्यात आलं आहे. निखिल आडवाणी दिग्दर्शित 'बाटला हाऊस' येत्या १५ ऑगस्ट रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.