अरे देवा! बाथटबमध्येच सुरु झाले Karan- Tejasswi, एका फोटोमुळे गडबड

सोशल मीडियासाठीसुद्धा त्यांचं हे प्रेमाचं नातं काही नवं नाही. पण, आता तर कहरच झाला

Updated: May 20, 2022, 04:58 PM IST
अरे देवा! बाथटबमध्येच सुरु झाले Karan- Tejasswi, एका फोटोमुळे गडबड  title=
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई : टेलिव्हिजन विश्वामध्ये अभिनेता करण कुंद्रा आणि अभिनेत्री तेजस्वी प्रकाश यांच्या नात्यानं आणि त्यांच्या प्रेमानं सर्वांची मनं जिंकली आहेत. रिअॅलिटी शोच्या निमित्तानंही त्यांचं हे नातं सर्वांनीच पाहिलं. सोशल मीडियासाठीसुद्धा त्यांचं हे प्रेमाचं नातं काही नवं नाही. पण, आता तर कहरच झाला. (Karan Kundrra aur Tejasswi Prakash Romantic Photo)

या जोडीचा एक फोटो नुकताच व्हायरल झाला आणि त्यानंच मोठी गजबड केली. करण आणि तेजस्वीचे रोमँटिक फोटो ठीक होते, पण हा बाथटबमधील फोटो मात्र सर्वांनाच पेचात टाक आहे. 

बरं इथं ते जे काही करत आहेत, तेसुद्धा एकसारखं पाहण्याजोगं. करणनं नुकतंच त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक फोटो शेअर केला. इथं तो प्रेयसी तेजस्वी प्रकाश हिच्यासोबत बाथटबमध्ये बसलेला दिसत आहे. बाथटबमध्ये हे दोघंही इंटिमेट दिसत आहेत. 

एकिकडे करणच्या हातात कसलीशी काचेची बाटली आहे, तर तेजस्वी तिथं खळखळून हसताना दिसत आहे. जांभळ्या रंगाची सँडल आणि करणचा पांढऱ्या कपड्यांतील लूक सर्वांनाच भावत आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Karan Kundrra (@kkundrra)

प्रेमात असणाऱ्या या जोडीचा फोटो सध्या तुफान व्हायरल झाला असून, त्यावर असंख्य लाईक्स आणि कमेंट् येण्यास सुरुवात झाली आहे. तेजस्वी आणि करणचं नेमकं काय चाललंय हेच अनेकांना कळत नाहीये, त्यामुळं ते समजून घेण्यासाठीही काहीजण हा फोटो पाहत आहे. थोडक्यात काय, फोटोची लोकप्रियता कायम.