हा अभिनेता राणी मुखर्जीचा क्रश; सर्वांसमोर भवना व्यक्त

कोण आहे हा अभिनेता, ज्यावर होतं राणीचं क्रश  

Updated: Nov 7, 2021, 09:20 AM IST
हा अभिनेता राणी मुखर्जीचा क्रश; सर्वांसमोर भवना व्यक्त title=

मुंबई : आज 90 च्या दशकातील कलाकारांची जागा नव्या कलाकारांनी घेतली असली तरी त्यांच्या चर्चा कायम रंगत असतात. कलाकार त्यांच्या चित्रपटांमुळे  नाही तर त्यांच्या अफेयर्स आणि इतर गोष्टींमुळे अधिक चर्चेत असतात. 90 च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक म्हणजे राणी मुखर्जी. राणीच्या चाहत्यांची संख्या आज देखील तितकीचं मोठी आहे. आता राणी ओळखली जाते तिच्या 'मर्दानी'मुळे... राणी लवकरच 'बंटी और बबली' चित्रपटाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. सध्या ती चित्रपटच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. 

आगामी चित्रपटाच्या प्रमोशनसाठी राणी अभिनेता सैफ अली खानसह रणवीर सिंगचा 'बिग पिक्चर शो'मध्ये पोहोचली होती. शोमध्ये राणी तिच्या क्रशबद्दल सांगितलं. शिवाय तिने हीट गाणं 'आती त्या खंडाला' वर ठेका देखील धरला. चित्रपटाबद्दल बोलत असताना 'गुलाम' चित्रपटाच्या शुटिंग दरम्यान अभिनेता आमिर खानवर क्रश आल्याचं राणीने सांगितलं. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

राणी पुढे म्हणाली, 'गुलाम चित्रपटाच्या चित्रीकरणा दरम्यान आणि 'कुछ कुछ होता है' चित्रपटाच्या चित्रीकरणा दरम्यान मी काही शिकली आहे. मला अत्यंत गर्व वाटतो मी आमिर आणि शागरुखसोबत काम करू शकली.'  'दी बिग पिक्चर' शोमध्ये राणीसह अभिनेता सैफ अली खान आणि सिद्धांत चतुर्वेदी देखील दिसणार आहे.