Sooryavanshi सिनेमाची पहिल्याच दिवशी Box Office वर जोरदार कमाई

अक्षय कुमारचा (Akshay Kumar) 'सूर्यवंशी' (Sooryavanshi) चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर प्रेक्षकांचा जोरदार प्रतिसाद

Updated: Nov 6, 2021, 09:05 PM IST
Sooryavanshi  सिनेमाची पहिल्याच दिवशी Box Office वर जोरदार कमाई title=

मुंबई : कोविडमुळे चित्रपटगृहांमध्ये बराच वेळ शांतता होती. सुरुवातीला सरकारच्या मार्गदर्शक सूचनांमुळे चित्रपटगृहे सुरू होत नव्हती, परंतु चित्रपटगृहे उघडली तरी लोक चित्रपटगृहांमध्ये चित्रपट पाहण्यास जात नव्हते. या काळात काहींना OTT वर चित्रपट पाहण्याची सवय लागली होती. (Sooryavanshi Box Office Collection Day 1)

'सूर्यवंशी'ची चांगली कमाई

अक्षय कुमारचा (Akshay Kumar) 'सूर्यवंशी' (Sooryavanshi) चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर चित्रपटगृहांमध्ये पूर्णपणे वेगळे वातावरण पाहायला मिळाले. पुन्हा एकदा चित्रपटगृहांमध्ये प्रचंड गर्दी आणि उत्साह होता. इतकेच नाही तर 'सूर्यवंशी'ने रिलीजच्या पहिल्याच दिवशी 26.29 कोटींची कमाई करत देशभरातील सिनेसृष्टीत धुमाकूळ घातला आहे.

'सूर्यवंशी' चित्रपटगृहात प्रदर्शित

कोरोना विषाणूच्या साथीमुळे चित्रपटाचे प्रदर्शन अनेकवेळा पुढे ढकलण्यात आले होते, परंतु अखेर दिवाळीच्या मुहूर्तावर रोहित शेट्टीने (Rohit Shetty) सिनेमा (Sooryavanshi) चित्रपटगृहात प्रदर्शित केला. 'सूर्यवंशी' रिलीज होताच, देशाच्या विविध भागांतील चित्रपटगृहांबाहेर रांगा लावलेल्या चाहत्यांचा उदंड प्रतिसाद आहे.

रोहित शेट्टीचा चित्रपटगृहांमध्ये धमाका

रिलायन्स एंटरटेनमेंटने सांगितले की, चित्रपटगृहांमध्ये मर्यादित प्रेक्षक असूनही चित्रपट बॉक्स ऑफिसवर खूप चांगला व्यवसाय करत असल्याचे देशातील अनेक भागांमध्ये दिसून आले आहे. रिलायन्सच्या म्हणण्यानुसार, रोहित शेट्टी दिग्दर्शित 'सूर्यवंशी'ने पहिल्याच दिवशी देशातील मोठ्या भागात 50 टक्के मर्यादा असूनही बॉक्स ऑफिसवर धूम ठोकली आहे. या सिनेमात अक्षय कुमार (Akshay Kumar), अजय देवगण (Ajay Devgan), रणवीर सिंग (Ranveer singh) आणि कॅटरिना कैफ (Katrina kaif) यांनी काम केले आहे.

थिएटर्स कधी आणि कुठे उघडली?

दिल्ली, राजस्थान, पंजाब, हरियाणा, मध्य प्रदेश, गुजरात, आंध्र प्रदेश आणि तेलंगणा या राज्यांसह अनेक राज्यांनी जुलै-ऑगस्टपासून चित्रपटगृहे पुन्हा सुरू केली. हिंदी चित्रपट उद्योगासाठी एक प्रमुख बाजारपेठ असलेल्या महाराष्ट्रातील चित्रपटगृहे ऑक्टोबरमध्ये 50 टक्के क्षमतेसह पुन्हा सुरू झाली.