मुंबईः संगीताचा बाहशाह ए.आर.रेहमान यांच्या मुलीचं काही दिवसांपूर्वी लग्न झालं. खुद्द रेहमान यांनी एक फोटो शेअर करत चाहत्यांना आनंदाची बातमी दिली. ए.आर.रेहमान यांची मुलगी खतिजा आणि रियासदीन यांनी लग्न केलं आहे. लग्नानंतर तिचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सध्या सर्वत्र खातिजाच्या लग्नाची चर्चा रंगलेली आहे.
सेलिब्रिटींपासून ते चाहते खातिजाला शुभेच्छा देत आहेत. नुकतेच खातिजाचे काही न पाहिलेले फोटो आणि व्हिडिओ समोर आले आहेत. ज्यामध्ये खातिजाची खास स्टाइल पाहायला मिळत आहे.
खातिजाने सोशल मीडियावर काही फोटो आणि व्हिडीओ पोस्ट केले आहेत. पण एका व्हिडीओमध्ये खातिजाचा मेकअप आणि तिच्या चेहऱ्यावर दिसणाऱ्या भावना अनेकांना जुने दिवस पुन्हा आठवण्यासाठी निमित्त ठरत आहे. एवढंच नाही तर अनेकांच्या डोळ्यात पाणी देखील आलं असेल.
अत्यंत भावनिक क्षणांचे फोटो खातिजाने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. दरम्यान, लग्नाबद्दल मुलीचे अभिनंदन आणि आशीर्वाद देताना एआर रहमानने लिहिले, 'देव या जोडप्याला आशीर्वाद देवो. तुम्हा सर्वांचे अभिनंदन आणि प्रेमाबद्दल धन्यवाद'
खतिजा आणि रियासदीन यांची डिसेंबर 2021 मध्ये एंगेजमेंट झाली होती. खुद्द खतिजाने इन्स्टाग्रामवर ही बातमी दिली होती. रेहमान यांची मुलगी खतिजा ही सुद्धा एक गायिका आहे.
तामिळ सिनेमातील अनेक सिनेमांमध्ये तिनं गाणी गायली आहेत. तर रियासदीन हा साऊंड इंजिनियर असून गेली अनेक वर्ष तोरेहमान यांच्यासोबतच काम करत आहे.