बोनी कपूर यांच्या दोन पत्नींच्या मृत्यूमधला अजब संयोग...

८० आणि ९० च्या दशकात बॉलिवूडवर अधिकारानं राज करणारी अभिनेत्री श्रीदेवी यांचं दुबईत निधन झालंय.

Updated: Feb 25, 2018, 02:21 PM IST
बोनी कपूर यांच्या दोन पत्नींच्या मृत्यूमधला अजब संयोग...  title=

मुंबई : ८० आणि ९० च्या दशकात बॉलिवूडवर अधिकारानं राज करणारी अभिनेत्री श्रीदेवी यांचं दुबईत निधन झालंय. बोनी कपूर यांच्या भाच्याच्या लग्नासाठी त्या दुबईत दाखल झाल्या होत्या. यावेळी त्यांची छोटी मुलगी खुशी आणि पती बोनी कपूर हेदेखील त्यांच्यासोबत उपस्थित होती. मोठी मुलगी जान्हवी मात्र शुटिंगच्या कारणामुळे मुंबईतच होती. 

अर्जुनचा 'इश्कजादे'

बोनी कपूर यांच्या दोन पत्नी मोना कपूर आणि श्रीदेवी यांच्या मृत्यूतही एक संयोग आहे. 

बोनी कपूर यांची पहिली पत्नी मोना कपूर यांचा मृत्यू २५ मार्च २०१२ रोजी कॅन्सरमुळे झाला होता. मोना - बोनी यांची दोन मुलं आहेत. त्यातील अर्जुन कपूर बॉलिवूडचा स्टार आहे तर त्याच्या बहिणीचं नाव अंशुला कपूर आहे.

बोनी कपूरनं १९८३ मध्ये मोनासोबत विवाह केला होता. लग्नानंतर तीन वर्षांनी म्हणजेच १९८५ मध्ये अर्जुन कपूरचा जन्म झाला होता. अर्जुन कपूरचा बॉलिवूड डेब्यू सिनेमा 'इश्कजादे' प्रदर्शित होण्यापूर्वीच मोना कपूर यांचा मृत्यू झाला होता. 'इश्कजादे' ११ मे २०१२ रोजी प्रदर्शित झाला होता. या सिनेमात अर्जुन सोबत परिणीती चोपडा महत्त्वाच्या भूमिकेत होती.

Related image
अर्जुन कपूर आई मोना कपूर यांच्यासोबत 

जान्हवीचा 'धडक'

लवकरच श्रीदेवी यांची मुलगी जान्हवी कपूर हिचा बॉलिवूड डेब्यू सिनेमा 'धडक' प्रदर्शित होणार आहे. परंतु, योगायोग म्हणजे, मोना यांच्याप्रमाणेच आपल्या अपत्याचा पहिला सिनेमा पाहण्याचं भाग्य श्रीदेवी यांनाही लाभलं नाही. त्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झालाय. 

जान्हवीचा 'धडक' हा सिनेमा करण जोहर प्रोड्युस करत आहे. हा सिनेमा मराठी सिनेमा 'सैराट'वर आधारित आहे. हा सिनेमा २० जुलै रोजी प्रदर्शित होणार आहे. या सिनेमात शाहिद कपूरचा भाऊ ईशान खट्टर याचीही प्रमुख भूमिका आहे.

Image result for sridevi daughters zee
श्रीदेवी आपल्या मुलींसोबत

बोनी कपूर यांचे दोन विवाह

मोना कपूर यांच्याशी विवाहीत असलेल्या बोनी कपूर यांचं श्रीदेवी यांच्यावर प्रेम जडलं होतं. मोना-बोनी यांना दोन मुलंही होती. परंतु, २ जून १९९६ रोजी बोनी कपूर आणि श्रीदेवी यांनी विवाह केला.