मुंबई पोर्ट ट्रस्टमध्ये नोकरीची सुवर्णसंधी

नोकरीच्या शोधात असलेल्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे.

Sunil Desale Sunil Desale | Updated: Dec 15, 2017, 09:17 PM IST
मुंबई पोर्ट ट्रस्टमध्ये नोकरीची सुवर्णसंधी  title=
Image: mumbaiport.gov.in

मुंबई : नोकरीच्या शोधात असलेल्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे.

मुंबई पोर्ट ट्रस्टमध्ये विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. एकूण २७ पदांसाठी ही भरती प्रक्रिया होत आहे. 

इच्छुक आणि पात्र उमेदवार या पदांसाठी अर्ज दाखल करु शकतात. अर्ज करण्यासाठी इच्छुकांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करावे लागणार आहेत.

एक नजर टाकूयात कुठल्या पदाच्या आणि किती जागांसाठी भरती प्रक्रिया होत आहे. 

पद: टंकलेखक आणि संगणक-लिपिक

पदांची संख्या: २०

शैक्षणिक योग्यता: टंकलेखक आणि लिपिक पदासाठी अर्ज करणारा उमेदवार हा प्रथम श्रेणीत बारावी पास असावा.

पगार: १६३०० ते ३८२०० प्रति महिना 

 

पद: वैद्यकीय अधिकारी

पदांची संख्या: 

शैक्षणिक योग्यता: वैद्यकीय अधिकारी पदासाठी इच्छुक उमेदवाराकडे एमबीबीएसची पदवी असावी.

पगार: २०६०० ते ४६५०० प्रति महिना 

 

पद: मुख्य कायदा अधिकारी 

पदांची संख्या: 

 

अर्ज करण्याची शेवटची तारीख: २२ डिसेंबर २०१७ 

या संदर्भातील अधिक माहिती इच्छुक आणि पात्र उमेदवारांना मुंबई पोर्ट ट्रस्टच्या www.mumbaiport.gov.in या संकेतस्थळावर पहायला मिळेल.