मुंबई : शरीरावर कोठे ना कोठे तरी तीळ नक्कीच असतो. काही ठिकाणी असलेल्या तीळामुळे सौंदर्यात भर पडते. तर काही विशिष्ट ठिकाणी असलेले तीळ तुम्ही धनवान होणार आणि विदेश यात्रा करणार असे सूचित करतात. तर जाणून घ्या तुमच्या अंगावरील तीळ काय सांगतात...
उजव्या गालावर तीळ तुम्ही खूप धनवान होणार असे सूचित करतात.
ओठांवर तीळ असलेली व्यक्ती धनवान असतात मात्र खूप जिद्दीही असतात.
ज्यांच्या नाकावर तीळ असतो ती व्यक्ती खूप धनवान असून जीवनभर खूप भ्रमंती करतात.
ज्यांच्या पायाच्या तळव्यांवर तीळ असतो ते लोक खूप फिरतात. अशा व्यक्तींना विदेश यात्रा करण्याची संधी लाभते.
ज्यांच्या कमरेवर तीळ असतो त्यांचे जीवन सुख सुविधांनी भरलेले असते. तरी देखील त्यांचे मन अशांत राहते.
ज्यांच्या कपाळावर भांगाच्या मध्यभागी तीळ असतो त्यांना धन संपत्ती उत्तम लाभते. परदेश गमनाचे योगही असतात.
उजव्या हातावर तीळ असणारे लोक धनवान आणि भाग्यवान असतात.
हनुवटीवर तीळ असलेल्या व्यक्तींना संपत्ती चांगली लाभते. मात्र हे लोक जास्त मनमिळावू नसतात.
पोटावर तीळ असलेल्या व्यक्तींना जेवण बनवण्यात रुची असते. याशिवाय हे धनवान असण्याचे लक्षण आहे.
छातीवर उजव्या बाजूला तीळ असणाऱ्या व्यक्तींकडे संपत्ती असतेच त्याचबरोबर त्यांना सुखी आनंदी जीवन लाभते.
उजव्या कानावर तीळ असलेल्या व्यक्ती कमी वयात धनवान होतात.
करंगळीवर तीळ असल्यास संपत्तीसाठी तो शुभ मानला जातो.
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.