दहावीच्या परीक्षेत तब्बल १९३ विद्यार्थ्यांचा १०० टक्के निकाल

दहावीचा निकाल गेल्यावर्षीच्या तुलनेत ०.८२ % घसरला असला तरी यंदा १९३ विद्यार्थ्यांचा १०० टक्के निकाल लागला आहे.  ४८,५७० विद्यार्थ्यांना ९० टक्क्यांहून अधिक मार्क मिळाले आहेत तर दहा विषयांचा निकाल १०० टक्के लागला आहे. ३९०३ विद्यार्थ्यांना स्पोर्ट्स सवलत मिळाली आहे.

Updated: Jun 13, 2017, 12:02 PM IST
दहावीच्या परीक्षेत तब्बल १९३ विद्यार्थ्यांचा १०० टक्के निकाल title=

मुंबई : दहावीचा निकाल गेल्यावर्षीच्या तुलनेत ०.८२ % घसरला असला तरी यंदा १९३ विद्यार्थ्यांचा १०० टक्के निकाल लागला आहे.  ४८,५७० विद्यार्थ्यांना ९० टक्क्यांहून अधिक मार्क मिळाले आहेत तर दहा विषयांचा निकाल १०० टक्के लागला आहे. ३९०३ विद्यार्थ्यांना स्पोर्ट्स सवलत मिळाली आहे.

दुपारी एक वाजता निकाल ऑनलाईन जाहीर होणार आहे. पण यंदाही राज्यात परीक्षेच मुलींनीच बाजी मारली आहे. दहावीच्या परीक्षेत एकूण 14,58,855 विद्यार्थी पास झाले आहेत. दहावीचा एकूण निकाल 88.74 टक्के लागला आहे. यामध्ये सर्वाधिक निकाल कोकण विभागाचा आहे. 88.74 टक्के कोकण विभागाचा निकाल लागला आहे तर नागपूर विभागाचा सर्वात कमी निकाल लागला आहे. नागपूर विभागाचा 83.67 टक्के निकाल लागला आहे. दहावीच्या परीक्षेचा एकूण 91.46 टक्के मुली तर 86.51 टक्के मुले पास झाले आहेत.