अशी झाली अनुष्काची बिदाई...

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा हे दोघे सोमवारी 11 डिसेंबरला इटलीत विवाहबद्ध झाले. 

Darshana Pawar Darshana Pawar | Updated: Dec 12, 2017, 11:29 AM IST
अशी झाली अनुष्काची बिदाई... title=

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा हे दोघे सोमवारी 11 डिसेंबरला इटलीत विवाहबद्ध झाले. 

चर्चांना पूर्णविराम 

काही दिवसांपासून यांच्या विवाहाच्या चर्चांना उधाण आले होते. मात्र दोघांकडूनही या बातमीला दुजोरा न दिल्याने ही अफवा असल्याचे बोलले जात होते. पण सोमवारी आपल्या विवाह सोहळ्याचे फोटोज सोशल मीडियावर शेअर करून दोघांनी या चर्चेला पूर्णविराम दिला. 

बिदाईचा व्हिडिओ 

फोटोजबरोबरच काही रितीरीवाजांचे व्हिडिओज देखील पाहायला मिळत आहेत. यात अनुष्काच्या बिदाईचा व्हिडिओ समोर आला आहे. यात अनुष्का काही उदास दिसली तर विराट अत्यंत खूश दिसत आहे.

अखेर लग्नाचा निर्णय

चार वर्ष रिलेशनशीपमध्ये राहिल्यानंतर दोघांनी अखेर लग्नाचा निर्णय घेतला. भारतातून दूर जात दोघे इटलीती बोर्गो फिनोचिएटो लक्झरी रिसोर्टमध्ये विवाहबद्ध झाले. 

लग्नाचे रिसेप्शन

21 डिसेंबरला दिल्लीत लग्नाचे रिसेप्शन आयोजित करण्यात आले आहे.