Shreyas deshpande
-
-
मुंबई : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पाचव्या वनडेमध्ये रोहित शर्मानं ११५ रन्सची खेळी केली. रोहितचं शतक आणि कुलदीप यादवच्या भेदक बॉलिंगमुळे भारतानं ही मॅच ७३ रन्सनी जिंकली. या विजयाबरोबरच भारतानं ६ वनडेच्या या सीरिजमध्ये ४-१नं विजयी आघाडी घेतली आहे. २६ वर्षांमध्ये पहिल्यांदाच भारतानं दक्षिण आफ्रिकेमध्ये सीरिज जिंकली आहे. मॅच संपल्यावर रोहित शर्मानं शतकाचं सेलिब्रेशन का केलं नाही, याचं उत्तर दिलं आहे. माझ्यासमोर कोहली आणि रहाणे हे दोन बॅट्समन रन आऊट झाले होते. अशा परिस्थितीमध्ये शतकाचं सेलिब्रेशन करण्याचा माझा मूड नव्हता, असं रोहित म्हणाला आहे. परदेशातल्या सीरिज विजयापैकी हा सर्वात मोठ्या विजयापैकी एक आहे. २००७-०८ साली ऑस्ट्रेलियातला सीबी सीरिज विजयही खास क्षण होता, अशी प्रतिक्रिया रोहितनं दिली आहे.
मुंबई : टी-20 वर्ल्ड कपची तारीख आणि ठिकाणाची घोषणा आयसीसीनं केली आहे. २०२० साली ऑस्ट्रेलियामध्ये टी-20 वर्ल्ड कप होणार आहे.
बंगळुरू : आयपीएलच्या ११व्या सिझनसाठीचा लिलाव संपला आहे. नेहमीप्रमाणेच या लिलावामध्ये खेळाडूंवर पैशांचा पाऊस पडला. तर काही दिग्गज खेळाडूंना जोरदार धक्का बसला.
बंगळुरु : आयपीएलच्या अकराव्या सिझनसाठीचा खेळाडूंचा लिलाव संपला आहे.
बंगळुरू : आयपीएलच्या अकराव्या मोसमासाठीचा लिलाव संपला आहे. तब्बल दोन दिवस चालणाऱ्या या लिलावामध्ये अनेक खेळाडूंवर पैशांचा पाऊस पडला तर काही दिग्गज खेळाडूंना झटकाही बसला आहे.
बंगळुरू : आयपीएलच्या अकराव्या हंगामासाठीचा लिलाव अखेर संपला आहे. दोन दिवस चाललेल्या या लिलावामध्ये खेळाडूंवर पैशांचा पाऊस पडला.
नवी दिल्ली : प्रजासत्ताक दिनानिमित्त दिल्लीमध्ये होणाऱ्या ध्वजारोहण कार्यक्रम आणि परेड कार्यक्रमाला काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींना आमंत्रण देण्यात आलेलं आहे.
जोहान्सबर्ग : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या टेस्टमध्ये भारतानं कमबॅक केलेलं आहे.
जोहान्सबर्ग : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या टेस्टमध्ये भारतीय बॉलर्सनी दक्षिण आफ्रिकेला जोरदार धक्के दिले आहेत.
केप टाऊन : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या टेस्टमध्ये भारतीय बॉलर्सनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे.