बंगळुरु : आयपीएलच्या अकराव्या सिझनसाठीचा खेळाडूंचा लिलाव संपला आहे. २ दिवस चाललेल्या या लिलावामध्ये अनेक टीमनी त्यांच्या जुन्या खेळाडूंना कायम ठेवलं तर काहींनी नव्या चेहऱ्यांना संधी दिली. तीनवेळा आयपीएलची ट्रॉफी जिंकणाऱ्या मुंबई इंडियन्सनं त्यांच्या महत्त्वाच्या खेळाडूंना कायम ठेवलं आहे. तर पहिल्या सिझनपासून त्यांच्याबरोबर असणाऱ्या खेळाडूंना मात्र नीता अंबानींच्या टीमनं पसंती दिली नाही.
मुंबई इंडियन्सनं रोहित शर्मा, हार्दिक पांड्या आणि जसप्रीत बुमराहला आधीच टीममध्ये कायम ठेवलं होतं. तर पोलार्ड आणि कृणाल पांड्याला राईट टू मॅच कार्ड वापरून मुंबईनं पुन्हा विकत घेतलं. पण मुंबईला ३ वेळा आयपीएल जिंकवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे हरभजन सिंग, लसीथ मलिंगा आणि अंबाती रायडू आता मुंबईकडून खेळताना दिसणार नाहीत.
लिलावामध्ये मुंबईनं ऑस्ट्रेलियाचा पॅट कमिन्स आणि बांग्लादेशचा मुस्तफिजूर यांच्यासारख्या दिग्गज फास्ट बॉलर्सना टीममध्ये घेतलं आहे. कमिन्स, मुस्तफिजूर आणि जसप्रीत बुमराह यांच्यामुळे मुंबईची बॉलिंग धारदार झाल्याचं पाहायला मिळतंय. याचबरोबर मुंबईनं राजस्थानचा स्पिनर राहुल चहरला १.९ कोटी रुपयांना, वेस्ट इंडिजचा धडाकेबाज ओपनर एव्हिन लुईसला ३.२ कोटी रुपयांना आणि सौरभ तिवारीला ८० लाख रुपयांना विकत घेतलं.
रोहित शर्मा- १५ कोटी रुपये
हार्दिक पांड्या- ११ कोटी रुपये
जसप्रीत बुमराह- ७ कोटी रुपये
कायरन पोलार्ड- ५.४ कोटी रुपये
मुस्तफिजूर रहमान- २.२ कोटी रुपये
पॅट कमिन्स- ५.४ कोटी रुपये
सुर्यकुमार यादव- ३.२ कोटी रुपये
कृणाल पांड्या- ८.८ कोटी रुपये
इशान किशन- ६.२ कोटी रुपये
राहुल चहर- १.९ कोटी रुपये
एव्हिन लुईस- ३.८ कोटी रुपये
सौरभ तिवारी- ८० लाख रुपये
बेन कटिंग- २.२ कोटी रुपये
प्रदीप सांगवान- १.५ कोटी रुपये
जेपी डुमिनी- १ कोटी रुपये
जेसन बेहरेनडोफ- १.५ कोटी रुपये
तेजींदर धिल्लोन- ५५ लाख रुपये
शरद लुम्बा- २० लाख रुपये
सिद्धेश लाड- २० लाख रुपये
आदित्य तरे- २० लाख रुपये
मयांक मारकंडे- २० लाख रुपये
अकिला धनंजय- ५० लाख रुपये
अनुकूल रॉय- २० लाख रुपये
एमडी निधीश- २० लाख रुपये