'म्हणून शतकानंतरही सेलिब्रेशन केलं नाही'

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पाचव्या वनडेमध्ये रोहित शर्मानं ११५ रन्सची खेळी केली.

Shreyas deshpande श्रेयस देशपांडे | Updated: Feb 15, 2018, 04:31 PM IST
'म्हणून शतकानंतरही सेलिब्रेशन केलं नाही' title=

मुंबई : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पाचव्या वनडेमध्ये रोहित शर्मानं ११५ रन्सची खेळी केली. रोहितचं शतक आणि कुलदीप यादवच्या भेदक बॉलिंगमुळे भारतानं ही मॅच ७३ रन्सनी जिंकली. या विजयाबरोबरच भारतानं ६ वनडेच्या या सीरिजमध्ये ४-१नं विजयी आघाडी घेतली आहे. २६ वर्षांमध्ये पहिल्यांदाच भारतानं दक्षिण आफ्रिकेमध्ये सीरिज जिंकली आहे.

मॅच संपल्यावर रोहित शर्मानं शतकाचं सेलिब्रेशन का केलं नाही, याचं उत्तर दिलं आहे. माझ्यासमोर कोहली आणि रहाणे हे दोन बॅट्समन रन आऊट झाले होते. अशा परिस्थितीमध्ये शतकाचं सेलिब्रेशन करण्याचा माझा मूड नव्हता, असं रोहित म्हणाला आहे.

परदेशातल्या सीरिज विजयापैकी हा सर्वात मोठ्या विजयापैकी एक आहे. २००७-०८ साली ऑस्ट्रेलियातला सीबी सीरिज विजयही खास क्षण होता, अशी प्रतिक्रिया रोहितनं दिली आहे.

रोहित-विराटचा रन आऊटचा इतिहास

रोहित शर्माबरोबर खेळत असताना रन आऊट व्हायची कोहलीची ही काही पहिली वेळ नाही. या मॅचआधी रोहितबरोबर खेळत असताना विराट ५ वेळा रन आऊट झाला आहे.

१ वेस्ट इंडिजविरुद्ध २०११ साली झालेल्या मॅचमध्ये विराट रन आऊट झाला. यावेळी रोहितनं ५७ रन्स केले.

२ २०१३ साली ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मॅचमध्ये रोहित आणि विराट एकत्र खेळत होते पण यावेळीही विराट शून्यवर रन आऊट झाला. या मॅचमध्ये रोहितनं २०९ रन्स केले.

३ २०१४ साली श्रीलंकेविरुद्धच्या मॅचमध्ये हे दोघं मैदानात होते. या मॅचमध्ये विराट ६६ रन्सवर आऊट झाला. या मॅचमध्ये रोहित शर्मानं वनडे क्रिकेटच्या इतिहासातला सर्वाधिक स्कोअर २६४ रन्स केल्या.

४ २०१६ साली रोहितबरोबर बॅटिंग करत असताना विराट चौथ्यांदा रन आऊट झाला. या मॅचमध्ये रोहितनं १२४ रन्स केले.

५ आजच्या मॅचमध्येही रोहितबरोबर बॅटिंग करत असताना विराट रन आऊट झाला. या मॅचमध्ये रोहितनं ११५ रन्सची खेळी केली.