GT vs RCB highlights, IPL 2024 : विल जॅक्सचा गुजरातला तडाखा! गुजरात टायटन्सवर 9 विकेट्सने मात

GT vs RCB Live Score, IPL 2024 : आयपीएल 2024 च्या 45 व्या सामन्यात अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये गुजरात टायटन्ससमोर, रॉयस चॅलेंजर्स बंगळुरूचे (Gujarat Titans vs Royal Challengers Bengaluru) आव्हान असणार आहे.   

GT vs RCB highlights, IPL 2024 : विल जॅक्सचा गुजरातला तडाखा! गुजरात टायटन्सवर 9 विकेट्सने मात

Gujarat Titans vs Royal Challengers Banglore Live Score in Marathi: आज अहमदाबादमध्ये गिलच्या गुजरात टायटन्ससमोर, डू प्लेसीच्या बंगळुरूचे आव्हान आहे, अशात कोणता संघ आज बाजी मारून पॉइंट्स टेबलमध्ये 2 महत्वाचे पॉइंट्स जिंकणार हे बघण्यायोग्य असणार आहे. 

28 Apr 2024, 16:28 वाजता

10 ओव्हरच्या समाप्तीनंतर गुजरात टायटन्सचा स्कोर असा 82-2 आहे. साई सुदर्शन हा 32 धावांवर खेळतोय, तर शाहरूख खान हा 23 धावांवर खेळत आहे. साई आणि शाहरूख या दोघं फलंदाजांमध्ये 62 धावांची भागीदारी झाली आहे.

28 Apr 2024, 16:24 वाजता

7 व्या ओव्हरमध्ये ग्लेन मॅक्सवेलच्या ओव्हरमध्ये गुजरात टायटन्सचा कॅप्टन शुभमन गिल हा 16 धावांवर आउट झाला आहे, दुसऱ्या विकेटनंतर शाहरूख खान हा फलंदाजीसाठी आला आहे. 7 व्या ओव्हरमध्ये गुजरातचा स्कोर आहे 47-2.

28 Apr 2024, 16:22 वाजता

पाच ओव्हरनंतर गुजरातचा स्कोर 35-1 असा आहे. शुभमन गिल हा 13 धावांवर खेळतोय, तर साई सुदर्शन हा पण 13 धावांवर खेळतोय. या दोघं फलंदाजांनी पहिल्या विकेटनंतर गुजरातच्या इनिंगला सावरलं आहे.

28 Apr 2024, 16:19 वाजता

गुजरात टायटन्सला पहिल्याच ओव्हरमध्ये स्वप्निल सिंगच्या गोलंदाजीवर वृद्धिमान साहाच्या रूपात पहिला धक्का बसला आहे. साहा हा फक्त 5 धावांवर बाद झाला, पहिल्या विकेटनंतर साई सुदर्शन हा फलंदाजीसाठी आलाय.

28 Apr 2024, 16:16 वाजता

GT vs RCB टॉस अपडेट - रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय

रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू प्लेइंग ईलेव्हन :

फाफ डू प्लेसिस (कर्णधार), विराट कोहली, विल जॅक्स, रजत पाटीदार, ग्लेन मॅक्सवेल, कॅमेरॉन ग्रीन, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), स्वप्नील सिंग, कर्ण शर्मा, मोहम्मद सिराज आणि यश दयाल.

गुजरात टायटन्स प्लेइंग ईलेव्हन :

शुभमन गिल (कॅप्टन), ऋद्धिमान साहा (विकेटकीपर), साई सुधारसन, डेव्हिड मिलर, अजमतुल्ला ओमरझाई, राहुल तेवतिया, शाहरुख खान, रशीद खान, रविश्रीनिवासन साई किशोर, नूर अहमद आणि मोहित शर्मा.