GT vs RCB highlights, IPL 2024 : विल जॅक्सचा गुजरातला तडाखा! गुजरात टायटन्सवर 9 विकेट्सने मात

GT vs RCB Live Score, IPL 2024 : आयपीएल 2024 च्या 45 व्या सामन्यात अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये गुजरात टायटन्ससमोर, रॉयस चॅलेंजर्स बंगळुरूचे (Gujarat Titans vs Royal Challengers Bengaluru) आव्हान असणार आहे.   

GT vs RCB highlights, IPL 2024 : विल जॅक्सचा गुजरातला तडाखा! गुजरात टायटन्सवर 9 विकेट्सने मात

Gujarat Titans vs Royal Challengers Banglore Live Score in Marathi: आज अहमदाबादमध्ये गिलच्या गुजरात टायटन्ससमोर, डू प्लेसीच्या बंगळुरूचे आव्हान आहे, अशात कोणता संघ आज बाजी मारून पॉइंट्स टेबलमध्ये 2 महत्वाचे पॉइंट्स जिंकणार हे बघण्यायोग्य असणार आहे. 

28 Apr 2024, 18:51 वाजता

विल जॅक्सने फक्त 41 बॉलमध्ये शतक ठोकून गुजरात टायटन्सला 9 विकेट्सने पराभूक केलयं आणि पॉइंट्स टेबलमध्ये महत्वपूर्ण 2 पॉइंट्स कमवले आहेत.

28 Apr 2024, 18:43 वाजता

15 ओव्हरनंतर आरसीबीचा स्कोर 177-1 असा आहे. मोहित शर्माच्या 15 व्या ओव्हरमध्ये विल जॅक्सने तब्बल 29 धावा ठोकल्या आहेत. या स्थितीत आरसीबीला 30 बॉलमध्ये 24 धावा जिंकण्यासाठी लागणार आहे.

28 Apr 2024, 18:40 वाजता

15 व्या ओव्हरमध्ये विल जॅक्सने फक्त 36 बॉलमध्ये 3 चौकार आणि 5 षटकारांच्या मदतीने आपलं अर्धशतक पूर्ण केलं आहे. कोहली आणि जॅक्सच्या भागीदारीमुळे आरसीबीने या सामन्यात आपली मजबूत पकड बनवली आहे.

28 Apr 2024, 18:17 वाजता

10 ओव्हरनंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा स्कोर 98-1 असा आहे. विराट कोहलीने याच ओव्हरमध्ये आपलं अर्धशतक पण पूर्ण केलं आहे. तर विल जॅक्स हा 16 धावांवर खेळत आहे. आरसीबीला येथून जिंकण्यासाठी 60 बॉलमध्ये 103 धावांची गरज आहे.

28 Apr 2024, 17:54 वाजता

5 ओव्हरनंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा स्कोर 48-1 असा आहे. विराट कोहली हा 14 धावांवर खेळतोय तर त्याचे साथ विल जॅक्स हा 4 धावांवर देत आहे. आरसीबीला या स्थितीतून जिंकण्यासाठी 30 बॉलमध्ये 153 धावांची गरज आहे

28 Apr 2024, 17:52 वाजता

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरचा कॅप्टन फाफ डू प्लेसी हा 24 धावांवर चौथ्या ओव्हरमध्ये साई किशोरच्या गोलंदाजीवर आउट झाला आहे. पहिल्या विकेटनंतर विल जॅक्स हा फलंदाजीसाठी आला आहे.

28 Apr 2024, 17:18 वाजता

फलंदाजीत गुजरात टायटन्सच्या 20 ओव्हरनंतर 201 धावांचे आव्हान रॉयल चॅलंजर्स बंगळुरूसमोर दिलं आहे. गुजरातकडून फलंदाजीत साई सुदर्शन याने नाबाद 84 धावांची उत्कृष्ट खेळी खेळलीये, तर  शाहरूख खान यानेसुद्ध 58 धावांची ताबडतोब खेळी खेळली आहे. तर बंगळुरूकडून गोलंदाजीत स्वप्नील सिंग, सिराज आणि मॅक्सवेल या तिघांनी प्रत्येकी, 1-1 विकेट घेतल्या आहेत.

आता बघण्यायोग्य गोष्ट असणार की, आरसीबीचे फलंदाज या टार्गेटला चेस करणार की, गुजरातची गोलंदाजी आपला कमाल दाखवुन बंगळुरूला रोखणार?

28 Apr 2024, 16:48 वाजता

15 ओव्हरनंतर गुजरात टायटन्सचा स्कोर 138-3 असा आहे. याच ओव्हरमध्ये साई सुदर्शन याने 34 बॉलमध्ये आपलं अर्धशतक सुद्धा पूर्ण केलं आहे. साई सुदर्शनने आपल्या अर्धशतकीय खेळीत 5 चौकार आणि 2 षटकार मारले आहेत.

28 Apr 2024, 16:44 वाजता

मोहम्मद सिराजच्या 15 व्या ओव्हरमध्ये गुजरात टायटन्सचा सेट बॅट्समन शाहरूख खान हा 58 धावांची उत्कृष्ट खेळी खेळून आउट झाला आहे. तिसऱ्या विकेटनंतर डेविड मिलर हा फलंदाजीसाठी मैदानात आलाय.

28 Apr 2024, 16:38 वाजता

गुजरात टायटन्सचा धाकड फलंदाज शाहरूख खान याने 23 बॉलमध्ये 3 चौकार आणि 5 षटकारांच्या मदतीने आपलं अर्धशतक पूर्ण केलं आहे. साई सुदर्शनही दुसऱ्या बाजूने 44 धावांवर खेळत आहे.