Mumbai Rain : उकाड्यापासून मुंबईकरांना दिलासा, मान्सूनपूर्व पावसाला सुरुवात, 'या' तारखेला मान्सून होणार दाखल

Monsoon in Mumbai : मुंबईकरांना उकाड्यापासून दिलासा मिळालाय. नवी मुंबई, सायनसह काही भागात मान्सूनपूर्व पावसाला सुरुवात झालीय. हवामान तज्ज्ञांच्या मते, मान्सून गोव्यात दाखल झाला असून तो 8 - 9 जूनपर्यंत मुंबईत पोहोचेल, असा अंदाज व्यक्त करण्यात आलाय. 

नेहा चौधरी | Updated: Jun 6, 2024, 06:40 AM IST
Mumbai Rain : उकाड्यापासून मुंबईकरांना दिलासा, मान्सूनपूर्व पावसाला सुरुवात, 'या' तारखेला मान्सून होणार दाखल title=
pre monsoon rain in mumbai meteorological department forecast maharashtra weather news monsoon reaches

Mumbai Rain:  दमटपणा आणि उष्णतेने त्रस्त मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे. नवी मुंबईपाठोपाठ मुंबईच्या काही भागात मान्सूनपूर्व पाऊस सुरु झालाय. उपनगर आणि शहराच्या काही भागात पावसाची नोंद झाली असून काही ठिकाणी पहाटेच्या सुमारास चांगला पाऊस झालाय. आज मुंबईतील वातावरण ढगाळ असणार असून काही ठिकाणी पाऊस बरसणार आहे. तर मुंबईकरांनी छत्री घेऊन घराबाहेर पडावं. 

हवामान विभाग आणि बीएमसीकडून मिळालेल्या माहितीनुसार, सायनमध्ये सर्वाधिक 33 मिमी, दादरमध्ये 29 मिमी, वडाळ्यामध्ये 27 मिमी, ओशिवरामध्ये 26 मिमी, चेंबूरमध्ये 20 मिमी पावसाची नोंद करण्यात आलीय. याशिवाय अंधेरीमध्ये 12 मिमी, जुहूत 9 मिमी, कांदिवली अग्निशमन केंद्रात 9 मिमी, घाटकोपर आणि बीकेसीमध्ये 5 मिमी, तर मागाठाणेमध्ये 2 मिमी पाऊस बरसलाय. मुंबईच्या इतर भागातील लोक अजून पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.