2000 रुपयात तुमच्या घराचा पूर्ण लूक आजच बदला

Home Decore :  घरात तेच ते पाहून आलाय कंटाळ आणि घरात आहे 2 हजार रुपयांची नोट मग आजच करा हे या गोष्टी आणि दोन हजार रुपयात करा घराचं डेकोरेशन...

दिक्षा पाटील | Updated: Jun 3, 2023, 06:13 PM IST
2000 रुपयात तुमच्या घराचा पूर्ण लूक आजच बदला title=
(Photo Credit : File Photo)

Home Decore : 2000 च्या नोटा सध्या सगळे लोक बॅंकेत जमा करत आहेत. हे पैसे पुन्हा एकदा बॅंकेत डिपॉझीट करण्याची अंतिम तारखेची घोषणा देखील करण्यात आली आहे. तेव्हा पासून प्रत्येक व्यक्ती ही आपण घरात कुठे 2 हजारची नोट ठेवली नाही हे चेक करताना दिसले. अशात तुमच्याकडे 2 हजारची नोट असेल तर त्या नोटा तुम्ही बॅंकेत डिपॉजिट करण्याच्या जागी तुमच्या घरातील सजावटीच्या वस्तु विकत घेण्यासाठी करू शकतात. तुमचं घर लहान जरी  असलं तरी या काही सोप्या टिप्स वापरून तुम्ही त्याला भव्य लूक देऊ शकता. 

वॉल आर्ट
आपल्या घराची भिंत ही अशीच रिकामी असेल तर ती कशी तरी दिसते. अशात घरात जर फ्रेम लावायचं म्हटलं तर त्यात फोटो देखील येतात आणि आवडतील अशा फ्रेमही स्वस्तात मिळत नाहीत. छोट्या छोट्या फ्रेम देखील 2 हजार रुपयांपेक्षा महाग असतात. अशात तुम्ही वॉल आर्ट विकत घेऊ शकतात. हे वॉल आर्ट तुम्ही ऑनलाइन किंवा मग कोणत्या दुकानात जाऊनही घेऊ शकतात. आता ऑनलाईन घेतल्यावर देखील तुम्ही तिथे कॅश ऑन डिलिव्हरीचा ऑप्शन निवडू शकतात आणि अशा प्रकारे तुमची दोन हजाराची नोट बॅंकेत डिपॉजीट करण्याची गरज भासणार नाही. कसं निवडला वॉल आर्ट... जर तुम्हाला वॉल आर्ट खरेदी करायचं असेल तर सगळ्यात आधी तुमच्या भिंतीच्या रंगाला मॅच होईल किंवा त्याहून थोडं डार्क असं वॉल आर्ट घ्या

लॅम्प
लॅम्प हा घर सजवण्यासाठी सगळ्यात सुंदर उपाय आहे. लॅम्प देखील तुम्हाला स्वस्तात आणि मस्त मिळेल यानं तुमचं घरही सुंदर दिसेल. लॅम्प तुम्ही ऑनलाइन देखील खरेदी करू शकतात किंवा कोणत्याही फ्ली मार्केटमधून. पण तुम्हाला वेगवेगळे आणि स्टायलिस्ट लॅम्प हवे असतील तर ते तुम्हाला ऑनलाइन उपलब्ध होतील. वेगवेगळ्या स्टाइल आणि कलरचे तुम्ही लॅम्प ऑनलाइन ऑर्डर करू शकतात. 

हेही वाचा : घरातील पालीपासून हवीये सुटका? मग लगेच करा 'हे' उपाय, नक्कीच होईल फायदा

कार्पेट
घरात जर सुंदर कार्पेट असेल तर त्याचा लूक आणखी उठून दिसतो. कार्पेट घरातील इंटेरिअरचा एक मोठा आहे. कार्पेटच्या मदतीनं तुम्ही घराता संपूर्ण लूक काही क्षणात बदलू शकता. ऑनलाइन किंवा कोणत्याही लोकल मार्केटमधून बाजारातून सहजरित्या खरेदी करू शकता.

झाडं किंवा रोपट
उन्हाळ्यात घरातली उष्णता कमी करण्यासाठी झाडं किंवा रोपटं खूप महत्त्वाची भूमिका पार पाडतात. घरातील तापमान थंड करण्यासोबतच  घरात वेगवेगळे रंग देखील दिसतात. जर तुम्ही जे रोप लावलं आहे त्याची कुंडी क्रिएटिव्ह डिझाइनची असेल तर घराचा लूक आणखीनच लवकर सुंदर दिसेल. अशा अनेक प्रकारे, तुम्ही लवकरच बंद होणाऱ्या 2 हजारांच्या नोटेचा वापर करून घर सुंदर बनवू शकतात.