घरातील पालीपासून हवीये सुटका? मग लगेच करा 'हे' उपाय, नक्कीच होईल फायदा

How to get rid of Lizards at home: तुमच्याही घरात सतत पाल येते. पालीची वाटते खूप भीती मग आताच करा हे घरगुती उपाय नक्कीच मिळेल पालीपासून सुटका... 

दिक्षा पाटील | Updated: Jun 3, 2023, 05:43 PM IST
घरातील पालीपासून हवीये सुटका? मग लगेच करा 'हे' उपाय, नक्कीच होईल फायदा title=

How to get rid of Lizards at home: आपल्या सगळ्यांना कधी ना कधी पाल फिरताना दिसते. सगळ्यात जास्त पाल आपल्याला उन्हाळ्यात दिसते. अनेकांना पालीची चिड असते तर काहींना भीती वाटते. जर तुम्हालाही तुमच्या घरात पाल दिसायला नको असे वाटत असेल तर काय करायला हवं हे जाणून घेऊया. बरेच लोक आहेत जे वेगवेगळ्या पद्धतीचा वापर करतात. तरी सुद्धा पाल ही घरातून जाण्याचं नाव काही घेत नाही. अशा परिस्थितीत तुम्ही काही अशा टिप्स वापरा ज्यानंतर तुम्हाला घरात एकही पाल दिसणार नाही. चला तर जाणून घेऊया नक्की काय करायला हवं...

लसून
लसून सोलून घरात, बाथरूममध्ये, बाल्कनीत आणि अशा सगळ्या ठिकाणी ठेवा जिथे तुम्हाला पाल दिसू शकते. कारण लसूनच्या वासानं पाल काहीच क्षणात घरातून बाहेर जाईल. 

कांदा
कांदा जेवढा आपल्या आरोग्यासाठी फायदे कारक आहे. तितकेच त्याचे अनेक फायदे आहेत. कांद्याच्या मदतीनं तुम्ही पालीपासून स्वत: ची सुटका करू शकता. त्यासाठी कांद्याचे तुकडे करा आणि घरातील कोपऱ्यांमध्ये आणि बाकीच्या इतर ठिकाणी ठेवा. कांद्याच्या वासानं पाल काही क्षणातच घरातून पळून जाईल. 

मोराचं पंख
पालीला घरातून पळवून लावायचं असेल तर घरात मोराचा पंख ठेवा. त्यासाठी घराच्या भिंतीवर मोर पंख हा सेलोटेपनं चिपकवा. त्यासोबतच अशा ठिकाणी देखील मोर पंख लावा जिथे पाल सतत दिसते. 

हेही वाचा : कॉकटेल पार्टीसाठी पाहिजे हटके लूक? मग 'या' टिप्स नक्कीच करा फॉलो

अंड्याचे साल
अंडं फक्त आपल्या आरोग्यासाठी चांगलं नाही तर त्यासोबत आपल्या घरात पाल येण्यापासून देखील वाचवू शकतं. अंड्याच्या सालीच्या मदतीनं तुम्ही पालीला घरात येण्यापासून थांबवू शकता. ज्या ठिकाणी सतत पाल येते त्या ठिकाणी तुम्ही अंड्याचं साल ठेवा त्यानं पाल तुमच्या घरात येणार नाही. 

नेफ्थलीन बॉल 
पालीला घरातून पळवायचं असेल तर त्यासाठी नेफ्थलीन बॉलचा वापर करू शकता. नेप्थलीन बॉल घरातील कोपऱ्या कोपऱ्यात ठेवा, त्यानं लवकरच पाली घरातून पळून जातील. 

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)