जगातील सर्वात महागडी द्राक्षं... एका दाण्याची किंमत महिन्याच्या पगारापेक्षाही जास्त

ही द्राक्षं खरेदी करण्यासाठी करावा लागेल लाखो रुपयांचा खर्च... द्राक्षाच्या घोसाची किंमत ऐकूनच तुम्हाला फुटेल घाम

Updated: Jul 6, 2021, 03:57 PM IST
जगातील सर्वात महागडी द्राक्षं... एका दाण्याची किंमत महिन्याच्या पगारापेक्षाही जास्त title=

मुंबई: द्राक्षाची किंमत काय असेल फार तर शंभर दीडशे रुपयांपासून सुरुवात होईल. अगदीच महागडी घ्यायचा विचार केला तर 500 रुपये असा अंदाज व्यक्त करू पण सर्वात महागडी द्राक्ष आता समोर आली आहे. या द्राक्षाच्या घोसातील एका दाण्याची किंमत जवळपास आपल्या एका महिन्याच्या सॅलरी एवढी आहे. ही द्राक्षं खरेदी करायची असतील तर साधारण लाखो रुपये खर्च करण्याची तयारी हवी. 

काही दिवसांपूर्वी लाखो रुपयांनी विकला जाणारा आंबा सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यानंतर आता जगातील सर्वात महागडी द्राक्ष समोर आली आहेत. आता एवढ्या महागड्या द्राक्षाची किंमत काय असेल आणि का असेल असा प्रश्न तर पडला असेलच.

जगातील सर्वात महागडी द्राक्षे

रूबी रोमन द्राक्षं (Ruby Roman grapes)ही जात अत्यंत दुर्मीळ आहे. प्रत्येक वर्षात केवळ या जातीच्या फळाचे 2,400 घोसांचं उत्पादन घेतलं जातं. याच्या गुणवत्तेची गॅरेंटीही घेतली जाते. याशिवाय बाजारपेठेत जेव्हा हे फळ विक्रीसाठी येत तेव्हा त्याला सर्टिफिकेशनही करण्यात येतं. त्यासाठी खास नियम तयार करण्यात आला आहे. हे सर्व नियम पाळून पुढे ग्राहकांपर्यंत द्राक्ष विक्रीसाठी येत असतात. 

या जातीचा आंबा २ लाख रुपयांपेक्षा जास्त किमतीचा, वजन पूर्ण १ किलो देखील नाही...का आहे एवढा महाग?

किती आहे किंमत?

असे एक फळ आहे, ज्याची किंमत (grapes Prcie)हजारो आणि लाखांमध्ये आहे. रुबी रोमन द्राक्षे वरवर पाहता इतकी नेत्रदीपक आहेत की फळांची किंमत भारतात सुमारे 7, 50,000 रुपये आहे. केवळ एका दाण्याची किंमत सुमारे 35 हजार रुपये आहे.

सर्वात महागड्या आंब्याच्या सुरक्षेसाठी, सगळ्यात हाय सिक्युरिटी

द्राक्षाचं वजन किती असतं? एवढी किंमत असण्याचं काय कारण? 

प्रत्येक द्राक्षाचे वजन 20 ग्रॅम असतं आणि ते पिंगपोंग बॉलच्या आकाराचे असतात. काही द्राक्षे 3 सेंटीमीटर इतक्या मोठ्या आकाराचीही असू शकतात. जपानी लक्झरी फळ बाजारामध्ये व्हिटिकल्चरला जास्त मागणी आहे. 2008 मध्ये रूबी रोमन द्राक्षने नवीन प्रीमियम द्राक्ष वाण म्हणून सुरुवात केली. Orissapost.comयांच्या वृत्तानुसार, सर्वात महाग द्राक्ष विकसित करण्यासाठी 14 वर्षांची गुंतवणूक करण्यात आली होती. त्यानंतर मग त्याची लागवड करण्यात आली.