White Diamond | जगातील सर्वधिक चकाकणाऱ्या हिऱ्याचा लिलाव; किंमत इतकी की स्वप्नातही विचार नसेल केला

White Diamond | हिरा त्याच्या चकाकीने ओळखला जातो. चकाकीनुसार त्याची किंमत ठरवली जाते. असाच एक हिरा आजकाल लिलावानंतर जगभर आपली चमक पसरवत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, जगातील सर्वात मोठा पांढरा हिरा 169 लाख रुपयांना विकला गेला आहे. लिलावात विकत घेतले.

Updated: May 13, 2022, 03:00 PM IST
White Diamond | जगातील सर्वधिक चकाकणाऱ्या हिऱ्याचा लिलाव; किंमत इतकी की स्वप्नातही विचार नसेल केला title=

मुंबई : World Biggest White Diamond | हिऱ्यांचा विचार केला तर त्याच्या किमतीची चर्चा नक्कीच होते. जगात सध्या हिऱ्याची मागणी वाढली आहे. सध्या एक हिरा त्याच्या किंमतीमुळे जगभर चर्चेत आहे. जगातील सर्वात मोठा पांढरा हिरा 'द रॉक' 1 अब्ज 69 लाख रुपयांना ($ 21.9 मिलियन) विकला गेला आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, या हिऱ्याचे वजन 228.31 कॅरेट आहे. हिरा कोणी विकत घेतला याची माहिती आयोजकांनी दिलेली नाही. या खरेदीत 5 जण सहभागी झाल्याचे निश्चितपणे सांगण्यात आले असले तरी. यापैकी 3 खरेदीदार अमेरिकेतील होते. तर 2 मध्य पूर्वेतील होते. सुरक्षेच्या कारणामुळे या सर्वांची नावे आयोजकांकडून गोपनीय ठेवण्यात आली आहेत.

2000 सालच्या दरम्यान हा हिरा खाणकामावेळी निघाला होता. तो आधी ज्वेलरी कलेक्टरने विकत घेतला. नंतर त्याने त्याचा वापर दागिन्यांमध्ये केला. आता 8 वर्षांनी त्यांनी तो पुन्हा विकला. हा हिरा दुर्मिळ असल्यानं त्याला खूप मागणी असल्याचं सांगण्यात येत आहे.

लिलावापूर्वी हा हिरा 2 अब्ज 32 कोटी रुपयांपर्यंत विकला जाईल, अशी अपेक्षा होती, मात्र त्याची बोली अपेक्षेपेक्षा थोडी कमी झाली आहे. रिपोर्टमध्ये असेही म्हटले आहे की, हा हिरा पहिल्यांदा न्यूयॉर्कमध्ये प्रदर्शित करण्यात आला होता. यानंतर दुबई आणि तैपेई येथेही त्याचे प्रदर्शन भरवण्यात आले.

या हिऱ्याच्या लिलावाबाबत सातत्याने बातम्या येत होत्या. खूप दिवसांपासून लोक याची वाट पाहत होते. अखेर 11 मे रोजी मालकाने त्याचा लिलाव केला.