Wife poisoning her husband: पती पत्नीच्या नात्यामध्ये एकमेकांना आयुष्यभर साथ देण्याचे वचन दिलेले असते. पण अनेकदा या वचनाला काळीमा फासण्याचा प्रकार घडतो. आपल्या पतीचे आयुष्य संपावे म्हणून पत्नी कॉफीमध्ये विष मिसळत होती. घरातील सीसीटीव्ही फुटेजमुळे हा प्रकार समोर आला. तुरुंगवास वाचावा म्हणून आता या महिलेने कोर्टात याचिका दाखल केली आहे. काय आहे हा प्रकार जाणून घेऊया.
मेलोडी फेलिकानो जॉनसन असे आरोपी महिलेचे नाव आहे. ती अमेरिकेतील एरिजोनाची रहिवाशी आहे. 11 जुलै आणि 18 जुलै 20023 दरम्यानपती रॉब जॉनसलच्या कॉफी मेकरमध्ये थोड्या प्रमाणात ब्लीच टाकताना तसेच जेवण-पेयात विष टाकल्याप्रकरणी तिला दोषी ठरवण्यात आले आहे. तिला कोर्टाने 3 वर्षांची शिक्षा सुनावली आहे.
मेलोडी आणि रॉबी जॉनसन यांना एक मुलगादेखील आहे. सध्या नवरा-बायकोमध्ये घटस्फोटाची कार्यवाही सुरु आहे. रॉबी जॉनसल हा अमेरिकेच्या वायु सेनेत कामाला आहे. 2023 पासून त्याला आपल्या कॉफीची चव बिघडल्याचे जाणवू लागले होते. त्यामुळे आपल्या कॉफीची त्याने चाचणी केली. यामध्ये धक्कादायक बाब त्याच्या लक्षात आली. त्याच्या कॉफीच्या कपात क्लोरीनचा मोठा स्तर आढळला.
सत्य पडताळून पाहण्यासाठी रॉबीने आपल्या किचनमध्ये एक हिडन कॅमरा लावला. यावेळी पत्नी कॉफीमध्ये अनोळखी पदार्थ टाकत असल्याचे त्याला दिसले. आपल्या निष्कर्षाची तक्रार त्यांना यूरोपमध्ये द्यायची नव्हती. म्हणून त्यांनी एरिजोना येथे तक्रार नोंदवली.
रॉबी जॉनसन अमेरिकेला परतले आणि त्यांनी अनेक छुप्या कॅमेराचा उपयोग केला. यात त्यांना अनेक खुलासे झाले. बायको मेलोडी ही एक कंटेनरमध्ये ब्लीच टाकते मग ते कॉफी मेकरमध्ये टाकते ही घटना सीसीटीव्ही फुटेजमध्ये कॅप्चर झाली.
पतीचा मृत्यू झाल्यास पत्नीला आर्थिक लाभ मिळेल. या उद्देशाने ती मारायचा प्रयत्न करत होती, असा ठपका पत्नीवर ठेवण्यात आला आहे. मेलोडीला जुलै 2023 मध्ये अटक करण्यात आली होती.