Viral Video : विमानतळावर रंगला WWE चा थरार; शिवीगाळ आणि केस ओढून महिलांची कुस्ती तर डझनभर लोकांचा राडा

Viral Video : विमानतळावर महिलांमध्ये WWE चा थरार रंगल्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या ट्रेंडिंगमध्ये आहे. या मारामारीमागील कारण ऐकून तुम्ही डोक्याला हात मारून घ्याल. 

नेहा चौधरी | Updated: May 25, 2023, 12:08 PM IST
Viral Video : विमानतळावर रंगला WWE चा थरार; शिवीगाळ आणि केस ओढून महिलांची कुस्ती तर डझनभर लोकांचा राडा title=
viral video passenger fight on chicago airport Video social media trending on internet

Trending Video : बस, लोकल ट्रेनमध्ये भांडताना आपण महिलांना पाहिलं आहे. बस, ट्रेन आणि लोकलमध्ये बसण्याच्या जागेवरून खास करुन या महिलांमध्ये वाद होताना आपण पाहिले आहेत. मुंबई लोकल ट्रेनमधील महिलांची हाणारी ही सोशल मीडियावर प्रसिद्ध आहे. पण सध्या सोशल मीडियावर जो व्हिडीओ ट्रेंडिंगमध्ये त्यात महिला चक्क विमानतळावर कुस्तीचा आखाडा तयार केला आहे. हो, अगदी बरोबर विमानतळावर महिलांनी एकमेकींना शिवीगाळ करत हाणामारी केली आहे. 

नुकतच बॉयफ्रेन्डवरुन शालेय मुलींचा राडाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यानंतर आता विमानतळावर महिलांची हाणामारी पाहून नेटकरी हैराण झाले आहेत. विमानतळ आणि विमानातील अनके विचित्र,धक्कादायक घटना गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. या घटनाचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

विमानतळावर रंगला WWE चा थरार

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, आंतरराष्ट्रीय विमानतळावर दोन जणांमध्ये तुफान हाणामारी होताना दिसून येत आहे. शिवीगाळ करत एकमेकांचे केस ओढत त्यांनी विमानतळाला कुस्तीचा आखाडा तयार केला. त्यानंतर या भांडण्यात अजून एका व्यक्ती एन्ट्री झाली. मग बघता बघता या हाणामारीत अनेक प्रवाशांनी उडी घेतली. ही हाणामारी रोखण्यासाठी पोलिसांना हस्तक्षेप करावे लागले. ज्या लोकांनी प्रथम महिलेवर हल्ला केला त्यांनी पोलिसांनी अटक केली आहे. (viral video passenger fight on chicago airport Video social media trending on internet )

अन् म्हणून महिलांची मारामारी झाली...

या व्हिडीओमधील घटना शिकागो आंतरराष्ट्रीय विमानतळावर घडली आहे. लॅगेज येतं त्या ठिकाणी हा धक्कादायक प्रकार घडला आहे. सामानावरून विमानतळावर हा अख्खा राडा घडला. 

हा व्हिडीओ @Mr_Bogus0007 नावाच्या ट्विटर अकाऊंटवर पोस्ट करण्यात आला आहे. 53 सेकंदांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर ट्रेंडिंगमध्ये आहे. दरम्यान विमानतळावर दिवसेंदिवस अशा घटना वाढत चालल्या आहेत. 

हेसुद्धा वाचा - Viral Video : 'मेरे बॉयफ्रेंड से गुलु गुलु करेगी तो...', भररस्त्यात मुलींचा दे दणादण राडा