इंडियन बॉसचा दुबईत डंका! कर्मचाऱ्यांच्या पत्नीला घर सांभाळण्याचा पगार देणार, आई वडिलांसह मुलांसाठीही खास प्लान

कोणत्याही कंपनीच्या यशात कर्मचाऱ्यांचा सिंहाचा वाटा असतो. दुंबईतील एका इंडियन कंपनीने कंपनीला 25 वर्ष पूर्ण झाल्यानंतर कर्मचाऱ्यांसब त्यांच्या कुटंबियांना देखील अवे सरप्राईज दिले आहेत. 

वनिता कांबळे | Updated: May 24, 2023, 08:25 PM IST
इंडियन बॉसचा दुबईत डंका! कर्मचाऱ्यांच्या पत्नीला घर सांभाळण्याचा पगार देणार, आई वडिलांसह मुलांसाठीही खास प्लान title=

Aries Group Of Companies : दुबईत कंपनीने असलेल्या इंडियन बॉसने सध्या सगळ्यांची मन जिंकली आहेत. ही बॉस कंपनीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसह त्यांच्या पूर्ण फॅमिलीला बोनस आणि गिफ्ट देण्याचा निर्णय घेतला आहे. संयुक्त अरब अमिराती (UAE) मध्ये असेलेल्या Aries Group Of Companies चे CEO सोहन रॉय यांनी कर्मचाऱ्यांना खूश करणारा निर्णय घेतला आहे. कंपनीला 25 वर्षे पूर्ण झाली आहेत. कंपनीच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्ताने ही कंपनी आपल्या कर्मचाऱ्यांसह त्यांच्या कुटुंबियांवर बक्षिसांचा वर्षाव करणार आहे. 

कंपनीच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्ताने जंगी सेलिब्रेशन 

Aries Group Of Companies  या भारतीय कंपनीची संयुक्त अरब अमिराती अर्थात दुबई मध्ये जोरदार चर्चा आहे. कारण या कंपनीचे बॉस अर्थात CEO सोहन रॉय यांनी घोषणाच तशी केली आहे. कंपनीच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्ताने जंगी सेलिब्रेशन करण्यात येत आहे. कंपनीला 25 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल कर्मचाऱ्यांना भेटवस्तू देण्याची घोषणा कंपनीने केली. मात्र, फक्त कर्मचारीच नाही तर आई-वडील, पत्नी आणि मुलांना देखील कंपनी भेट देणार आहे. 

भारतात राहणाऱ्यांना कर्मचारी आणि कुटुंबियांची दुबई सफर

रौप्य महोत्सवी वर्षानिमित्ताने  कंपनी कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांवर बक्षिसांचा वर्षाव करणार आहे. यासाठी कंपनीने तब्बल 30 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. गिफ्टचे वितरण करण्यासाठी कंपनीने एक अप्रतिम फॉर्म्युलाही तयार केला आहे. दुबईत या कंपनीचा  रौप्य महोत्सवी सोहळा पार पडला. या साठी कंपनीने भारतात काम करणाऱ्या 25 कर्मचाऱ्यांना आणि त्यांच्या  कुटुंबियांना दुबईची सफर घडवली. 

बायकोला पगार देणार

रौप्य महोत्सवी वर्षानिमित्ताने  कंपनीने कर्मचाऱ्यांना मोठी वेतनवाढ जाहीर करत बोनस देखील दिला आहे.  वरिष्ठ कर्मचाऱ्यांसाठी घरे बांधणे आणि कर्मचाऱ्यांच्या मुलांना शैक्षणिक भत्ता आणि शिष्यवृत्ती देणे अशा अनेक योजना कंपनी राबवत आहे. ज्या कर्मचाऱ्यांच्या पत्नी गृहिणी आहेत किंवा कोणतेही काम करत नाहीत अशा कर्मचाऱ्यांच्या पत्नीला देखील कंपनी  पगार देणार आहे. पतीच्या कमाईतील 25 टक्के रक्कम त्यांच्या पत्नीच्या खात्यात जमा होणार आहे. 

Aries Group Of Companies 25 देशांमध्ये व्यवसाय 

सोहन रॉय हे  Aries Group Of Companies चे CEO आहेत. या कंपनीचा  25 देशांमध्ये व्यवसाय आहे. सोहन रॉय हे मरीन इंजिनिय आहेत.  1998 मध्ये त्यांनी सागरी आणि अभियांत्रिकी सेवा उपलब्ध करुन देण्यासाठी ही कंपनी सुरू केली. यानंतर आता या कंपनीचा विस्तार इतका वाढला आहे की व्यवसायासोबतच ते चित्रपट निर्मितीशी जोडले गेले आहेत. Aries Group Of Companies मध्ये सध्या 2200 हून अधिक कर्मचारी काम करत आहेत. या कंपनीचा व्यवसाय 25 देशांमध्ये विस्तारलेला आहे.