सासूसोबत सुरू होतं जावयाचं अफेअर, बायकोने व्हिडीओ कॉल केल्यावर 'या' अवस्थेत सापडले दोघे...

आईचं मुलं नातं खूप खास असतं. पण सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होतो आहे. ज्यामध्ये एका आईनेच लेकीचा संसार उद्धवस्त केलं आहे. 

नेहा चौधरी | Updated: Nov 19, 2023, 07:36 PM IST
सासूसोबत सुरू होतं जावयाचं अफेअर, बायकोने व्हिडीओ कॉल केल्यावर 'या' अवस्थेत सापडले दोघे... title=
viral news wife caught husband with her own mother Extramarital affair video trending news

नातं कुठलंही असो ते विश्वास आणि प्रेमावर उभं असतं. आई वडिलांना आपली मुलं कायम सुखी राहवी अशी अपेक्षा असते. त्यासाठी ते दिवसरात्र मेहनत आणि देवाकडे प्रार्थना करत असतात. दुसरीकडे नवरा बायकोमधील नातं हे प्रेम, आदर आणि विश्वासावर उभं असतं. पण गेल्या काही काळात अनैतिक संबंध, विवाहबाह्य संबंधांचे प्रमाण वाढलं आहे. कपलमधील एकाही जोडीदाराने संसाराच्या घडीला तडा देत बाहेर पाऊल ठेवलं तर सगळं उद्धवस्त होतं. 
ऑफिसमध्ये, शेजारी राहणारे किंवा ऑनलाइन अफेअरच्या अनेक घटना आपण ऐकल्या आहेत. अगदी नातेसंबंधांमध्ये मामी भाच्या, सावत्र आई - सावत्र मुलाचं प्रेम प्रकरणाचे अनेक घटनांबद्दल आपण ऐकलं आहे. पण सध्या सोशल मीडियावर एका पत्नीचा व्हिडीओ व्हायरल होतो आहे. ज्यामध्ये तिने पतीच्या कारनामा उघड केला आहे. तिच्या प्रेमाला तडा देताना रंगेहाथ तिने पकडलं आहे तेही अशा महिलेसोबत की त्यानंतर त्याच्या आयुष्यात भूकंप आला. 

सासूसोबत सुरू होतं जावयाचं अफेअर!

या महिलेने सोशल मीडियावर शेअर केल्या व्हिडीओमध्ये दावा केला आहे की, तिच्या आईचं तिच्या नवऱ्यासोबत अफेअर सुरु आहे. तिने या दोघांना रंगेहात पकडलं आहे. नेमकं काय झालं आणि कसे नवऱ्याचा कारनामा समोर आला, याबद्दल तिने या व्हिडीओमध्ये सांगितलं आहे. 

तिने या व्हिडीओमध्ये सांगितलं की, त्याच्या नवऱ्याचं आणि आईचं अफेअर सुरु असल्याची कल्पना आजीकडून तिला मिळाली होती. तिला आजीने सांगण्यापूर्वीच नवऱ्यावर संशय होता. त्याचं कुठे तरी अफेअर सुरु आहे, पण तिने त्यावेळी दुर्लक्ष केलं. 

या व्हिडीओमध्ये तिने सांगितलं की, आयुष्यात सर्वात जास्त प्रेम आणि विश्वास ठेवला त्यांनीच तिच्या पाठीत खंजीर खुपसलं. त्याचा नवरा आणि आई वेगवेगळ्या कारण्याने एकमेकांना भेटत होते. व्हॅलेंटाइन डेच्या दिवशी नवऱ्याने माझ्यासाठी गुलाबांची फुलं आणली होती. त्यावेळी त्याने माझ्या आईसाठीही गुलाब आणले होते. त्यावेळी मला त्याचा अभिमान वाटला होता. तो माझ्या आईची काळजी घेतो असं वाटलं होतं. पण व्हॅलेंटाइन डेच्या दोन दिवसांनंतर माझ्या आयुष्यात भूकंप आला. माझ्या नवरा आणि आईचं प्रेम प्रकरण माझ्या समोर उघड झालं. 

द सनच्या रिपोर्टनुसार गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात एक रात्री 9 वाजता तिने नवऱ्याला व्हिडीओ कॉल केला होता. त्यावेळी तिला कळलं की तो तिला खोटं सांगून वेगळ्याच ठिकाणी गेला आहे. ते दोघे बोलत असतानाच मागून एका महिलेचा आवाज आला. तो आवाज तिला ओळखीचा वाटला. तिने लगेचच बहिणीला फोन केला आणि तिने आईबद्दल विचारलं. त्यावेळी बहिणीने सांगितलं की, तुझा नवरा घरी आला होता आणि आईला घेऊन बाहेर गेला आहे. 
या विश्वासघातानंतर तिने नवऱ्याला घटस्फोट दिला. लेकीचा संसार मोडल्यानंतर जावयाने सासूलाही दगा दिला. पण लेकीच्या वडिलांनी तिच्या आईचा पुन्हा स्विकार केला. ही धक्कादायक घटना आहे अमेरिकेतील इडाहोमध्ये राहणाऱ्या कॅथरीनची. कॅथरीन टिकटॉकवर व्हिडीओ शेअर करत या घटनेबद्दल लोकांना सांगितलं आहे. या व्हिडीओ आतापर्यंत 9.6 मिलियनपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत.