ऑस्ट्रेलियन सुंदरीला हरवून झाली मिस युनिव्हर्स 2023; कोण आहे निकारागुआची शेनिस पॅलासिओ?

Miss Universe 2023 : सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे ती म्हणजे मिस युनिव्हर्स 2023 ची. यावेळी थायलंड आणि ऑस्ट्रेलियन सुंदरीला हरवून निकारागुआच्या शेनिस पॅलासिओस हिनं मिस युनिव्हर्सचा यावर्षीचा किताब जिंकला आहे. 

Updated: Nov 19, 2023, 01:41 PM IST
ऑस्ट्रेलियन सुंदरीला हरवून झाली मिस युनिव्हर्स 2023; कोण आहे निकारागुआची शेनिस पॅलासिओ?  title=
miss universe 2023 sheynni palacio wins miss universe crown after answering this question

Miss Universe 2023 : आज सुष्मिता सेनचा वाढदिवस आहे. त्यातून हीच सुष्मिता 1994 साली मिस युनिव्हर्स झाली होती. आज भारत आणि ऑस्ट्रेलिया वर्ल्ड कप फायनल मॅचही आहे. याची सर्वत्र चर्चा असतानाच 23 वर्षीय निकारागुआच्या शेनिस पॅलासिओस हिनं यावर्षीच्या मिस युनिव्हर्सचा किताब पटाकवला आहे. 29 वर्षांपुर्वी सुष्मिता सेन हिनं मिस युनिव्हर्स हा किताब पटकावला होता. आज तिच्या वाढदिवसाच्या दिवसापुर्वी मिस युनिव्हर्सच्या विजेतीची घोषणा झाली आहे. हा सोहळा काल 18 नोव्हेंबर रोजी पार पडला. 

यावेळी मिस युनिव्हर्सच्या अंतिम स्पर्धेत जोरात चुरस होती. आपल्या सौंदर्याच्या, व्यक्तिमत्त्वाच्या आणि बुद्धीच्या जोरावर या सर्वच तरूणींनी सर्वांचीच मनं जिंकून घेतली परंतु त्यातील एकच तरूणी ही विश्वविजेती ठरली आहे. जेनी मे, मारिया मेनॉनस आणि माजी मिस युनिव्हर्स ओलिव्हिओ कुलपो यांनी मिस युनिव्हर्स 2023 चे आयोजन केले होते. या स्पर्धेत एकूण 84 देशातील स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. यावेळी उपांत्य फेरीत 20 स्पर्धकांची निवड करण्यात आली होती. या उपांत्य फेरीत पोहचलेल्या स्पर्धकांमध्ये भारताची मॉडेल श्वेता शारदा हिचाही समावेश होता. श्वेता शारदा हिनं मिस इंडिया 2023 चाही किताब जिंकला आहे. त्यामुळे तिला बरीच ओळख मिळाली आहे. इन्स्टाग्रामवरही तिचे अनेक फॉलोवर्स आहेत. 

कोणत्या प्रश्नामुळे जिंकला मिस युनिव्हर्सचा किताब?

यावेळी अंतिम स्पर्धेत विचारलेला प्रश्न खूप रंजक होता. परंतु तितकाच कठीणही होता. कोणत्या एका महिलेचे आयुष्य एक वर्ष जगायला आवडेल असा प्रश्न यावेळी निकारागुआच्या शेनिस पॅलासिओ हिला विचारण्यात आला होता. यावेळी तिनं दिलेल्या उत्तरानं उपस्थितांची मनं जिंकली आहेत. महिला हक्क कार्यकर्त्या आणि स्त्रीवादाची जननी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मेरी वोलस्टोनक्राफ्टचं आयुष्य एक वर्ष जगायला आवडेल असं शेनिस म्हणाली. मिस युनिव्हर्स हा किताब जिंकणारी निकारगुआतील शेनिस पॅलासिओ ही पहिली महिला आहे. आपलं नावं जाहीर झाल्यावर तिच्या डोळ्यात आनंदाश्रू होते. यावेळी ऑस्ट्रेलियाची मोरया विल्सन ही दुसरी रनर अप ठरली तर थायलंडची एन्टोनिया पोर्सिल्ड ही पहिली रनर अप आहे. 

उपांत्य फेरीतील भारतीय स्पर्धक कोण?

शारदा ही मुळची चंदीगढची रहिवासी आहे. तिचे शिक्षण हे मॉडर्न कॉम्प्लेक्स मणिमाजरा येथील आहे. तिचं शिक्षणही मॉडेल स्कूल मधून झालं आहे. टॉप 20 मध्ये आल्यानं प्रत्येकालाच फार आशा होत्या. सध्या त्यामुळे तिचीही सध्या बरीच चर्चा ही रंगलेली आहे.