लग्नाच्या चार वर्षांनी असं काय घडलं? पत्नीने फोटोग्राफरकडे परत मागितले पैसे

एका महिलेने लग्नाच्या तब्बल चार महिन्यांनंतर चक्क लग्नात फोटो काढणाऱ्या फोटोग्राफरकडे दिलेले पैसे परत मागितले आहेत. त्या फोटोग्राफरने महिलेसोबत व्हॉट्सअॅपवर झालेलं  संभाषण सोशल मीडियावर शेअर केलं आहे.   

राजीव कासले | Updated: Aug 26, 2023, 10:05 PM IST
लग्नाच्या चार वर्षांनी असं काय घडलं? पत्नीने फोटोग्राफरकडे परत मागितले पैसे title=

Trending News : लग्न हा प्रत्येक स्त्री आणि पुरुषाच्या आयुष्यातील अनमोल क्षण असतो. आपल्या लग्नातील अविस्मरणीय क्षण कायमचे लक्षात राहावेत यासाठी फोटोग्राफरही ठेवला जातो. लग्नानंतर ते फोटो पाहून आपले ते क्षण आठवले जातात. त्यातच आता प्री वेडिंग शूटचंही फॅड आलं आहे. यासाठी लोकं लाखो रुपये खर्च केले जातात. पण काही कारणाने लग्न मोडलं तर ती फोटोग्राफरची जबाबदारी असून त्याला दिलेले पैसै त्याने परत करावेत, असं तुम्ही कधी ऐकलं आहे का? आता तुम्ही म्हणाल घटस्फोट आणि फोटोग्राफारचा काय संबंध? अगदी बरोबर आहे. पण एका महिलेने चक्क पतीबरोबर झालेल्या घटस्फोटानंतर चक्क फोटोग्राफरकडे पैसे मागितले आहेत. (Woman asked refund from photographer)

ट्विटर अकाऊंट लान्स रोमियो (@LanceRomeo) फोटोग्राफीवर याप्रकरणाशी संबंधीत व्हॉट्सअॅप चॅटचे स्क्रीनशॉट्स शेअर करण्यात आले आहेत. हे वाचून नेटिझन्स हैराण झाले आहेत. सोशल मीडियावर हे प्रकरण सध्या चांगलच गाजतंय. 

चार वर्षांपूर्वी झालं होत लग्न
या महिलेचं लग्न चार वर्षांपूर्वी झालं होतं. चार वर्षांनी तीने पतीबरोबर घटस्फोट घेतला. घटस्फोटच्या काही दिवसांनी त्या महिलेने लग्नात फोटो काढलेल्या फोटोग्राफरला व्हॉट्सअॅप मेसेज टाकला. यात तीने लिहिलं होतं. हाय रोमियो कसा आहेस? तुला मी आता आठवत असेन की नाही मला माहित नाही. पण 2019 मध्ये डर्बनमध्ये माझ्या लग्नात तू फोटोशूट केलं होतंस. त्यावर रोमियोने आपण ओळखत असल्याचा रिप्लाय दिला. 

त्यानंतर महिलेने उत्तरादाखल लिहिलं, माझा घटस्फोट झाला आहे आणि माझ्या पतीबरोबरच्या कोणत्याच आठवणी मला नकोयत. त्यामुळे तू आमच्या लग्नात काढलेले फोटोही आता बेकार झालेत. तू चांगले फोटो काढले होते. पण आता ते फोटो काही कामाचे नाहीत. त्यामुळे तुला लग्नात फोटो काढण्यासाठी दिलेले पैसे तू मला परत कर. 

महिलेच्या पतीने मागितली माफी
सुरुवातीला फोटोग्राफरला ती महिला आपल्याबरोबर मस्करी करत असल्याचं वाटलं. पण तीने हे प्रकरण जास्तच गांभीर्याने घेतलं होतं. त्या महिलेने फोटोग्राफरबरोबर वाद घालायला सुरुवात केली. फोटोग्राफरने पैसे द्यायला नकार दिल्यानंतर त्या महिलेने थेट वकिलांची धमकी दिली. माझा वकिल तुला नोटीस पाठवेल असं त्या महिलेने सांगितलं. हे प्रकरण भलत्याच मार्गावर जात असल्याचं पाहताच, त्या फोटोग्राफारने सर्व चॅटचे स्क्रीनशॉट्स त्या महिलेच्या पतीला पाठवले. 

पतीने ते सर्व स्क्रिनशॉट्स वाचल्यानंतर फोटोग्राफरला फोन करुन पत्नीतर्फे माफी मागितली. सोशल मीडियावर त्या महिलेबरोबरचे चॅट फोटोग्राफरने शेअर केले असून त्यावर अनेकजणांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. जगातील असं पहिलंच प्रकरण असल्याचं अनेकांनी म्हटलं आहे.