VIDEO : जखमी चित्ताला पाहून फोटोग्राफरने केली मदत, चित्ताचं ते कृत्य जिंकतंय नेटकऱ्यांचं हृदय

Viral Video : चित्ताचं नाव घेतलं तरी आपल्याला घाम फुटतो. पण जंगलात जखमी चित्ता पाहून फोटोग्राफने त्याला मदत केली. त्यानंतर चित्ताने जे केलं त्या क्षणाचा हृदयस्पर्शी व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. 

नेहा चौधरी | Updated: Aug 26, 2023, 04:26 PM IST
VIDEO : जखमी चित्ताला पाहून फोटोग्राफरने केली मदत, चित्ताचं ते कृत्य जिंकतंय नेटकऱ्यांचं हृदय title=
injured cheetah expresses gratitude to photographer for help video viral on Social media trending now

Viral Video : सोशल मीडियावर साप, सिंह, वाघ, हत्ती या प्राण्यांचे अनेक व्हिडीओ पाहिला मिळतात. काही व्हिडीओ इतर भयानक असतात की आपल्याला घाम फुटतो. खरं तर या प्राण्यांचे नाव जरी घेतलं तरी आपलं शरीर थरथर कापत. मग विचार करा चित्ता तुमच्या समोर आला तर...
झाली बोलती बंद तुमची. चित्ता हा जमिनीवरील सर्वात वेगाने धावणारा प्राणी आहे. असं म्हणतात तो त्याचा शिकार कधी चुकवत नाही. चित्ता हा मांसाहारी प्राणी असून त्याचा धारदार दाताने तो कुत्र्यालाही सहज फाडून टाकू शकतो एवढी त्याची क्षमता आहे. (injured cheetah expresses gratitude to photographer for help video viral on Social media trending now)

मग एका फोटोग्राफरच्या समोर हा जंगलातील सर्वात खतरनाक प्राणी उभा ठाकतो तेव्हा...असं म्हणतात जोपर्यंत चित्ता आक्रमक होत नाही तोपर्यंत तो धोकादायक नसतो. पण तरीदेखील प्राण्याचा काही नेम नसतो. 

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये ज्यामध्ये चित्ता एका व्यक्तीसोबत प्रेम करताना दिसतं आहे. चित्ता आणि या माणसाची कथा नक्कीचं तुमचंही मनं जिंकेल यात शंका नाही. 

झालं असं की, एक वन्यजीव छायाचित्रकाराला जंगलात फोटो काढत असताना अचानक घायाळ झालेला चित्ता दिसतो. त्याची अवस्था पाहून फोटोग्राफर त्याचा जवळ जातो. चित्ता अतिशय जखमी झालेला असतो. फोटोग्राफरला त्याची ही अवस्था बघवत नाही. तो लगेचच त्याचा जवळील पाण्याची बाटल काढून तळहातावर पाणी घेतो आणि चित्ताला पाणी पाजतो. तिचाही शांतपणे ते पाणी लगेचच पितो. 

त्यानंतर या चित्ताला त्याचा सहकारीच्या मदतीने  रेस्क्यू स्टेशनवर घेऊन येतो. तिथे चित्तावर उपचार करण्यात येतो. काही दिवसांनी तो बरा झाला आणि पिंजऱ्यात असताना तो आपली मदत करणाऱ्या फोटोग्राफरला पाहतो. तो त्या फोटोग्राफरला ओळखतो. 

पिंजऱ्यातून बाहेर आल्यानंतर फोटो ग्राफर त्याचा फोटो काढत असताना एखाद्या लहान मुलासारखा येऊन हा भयानक चित्ता त्याचा मिठीत विसावतो. चित्ता पूर्ण बरा झाल्यानंतर त्याला जंगलात सोडण्यात येतं. 

पण जेव्हा काही दिवसांनी तो फोटोग्राफर जंगलात जातो. तेव्हा फोटोग्राफरला पाहून चित्ता न डगमगता त्याला जाऊन अलगद मिठी मारतो. चित्ताच्या या कृत्यामुळे त्याने फोटोग्राफर प्रती आली कृतज्ञता भावना व्यक्त केली आहे असंच दिसतं. माणुसकी आणि कृतज्ञता काय असते हे या प्राण्यांकडून शिकायला हवं. 

आपण आपल्या आजूबाजूला पाहतो. माणसं कठीण प्रसंगात असताना इतरांची मदत घेतात पण त्या संकटावर मात केल्यावर मदत करणाऱ्या व्यक्तीचाच घात करतात. 

दरम्यान हा व्हिडीओ सोशल मीडिया X वर Hakan Kapucu या यूजर्सने त्याचा अकाऊंटवर शेअर केला आहे. या व्हिडीओला आतापर्यंत 3.5 दशलक्षाहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. नेटिझन्सदेखील मोठ्या प्रमाणावर हा व्हिडीओ पुन्हा पोस्ट करत आहेत. या व्हिडीओवर कंमेंट्सचा पाऊस पडतो आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर टूडे ट्रेंडिंग व्हिडीओ ठरला आहे.