Social Media Trending Video : नवरा बायकोमधील (Husband-Wife)नातं खूप खास असतं. प्रेमासोबतच (Love) कधी रुसवा-फुगवा, गंमती-जमती आणि मजा मस्ती वालं हे नातं जेव्हा आयुष्याच्या अशा टप्प्यात येतं. जेव्हा आपण आजी आजोबा होतो. त्यावेळी आपल्याला सगळ्यात जास्त जोडीदाराची गरज भासते. रोजच्या धावपळीत नवरा-बायको अनेक क्षण जगायचे राहू जातात. जबाबदाऱ्या, नोकरी आणि कर्तव्य या सगळ्यांमध्ये बायकोसोबतचे खास क्षण जगणं राहून जातं. असाच एक आजोबा-आजीचा मेट्रोमधील (Metro) मजेदार व्हिडीओ ( funny video) सध्या सोशल मीडियावर (Social Media) तुफान व्हायरल (Viral Video) होतं आहे.
या व्हिडिओमध्ये एक वृद्ध जोडपे (old couple) मेट्रोमधून प्रवास करताना दिसतं आहे. बाजूला काही तरुण छान म्युझीक वाजवत आहे. आजोबांना म्युझिक इतकं आवडलं की, त्यांनी आजीला डान्स करण्यासाठी विचारलं. पण आजीबाई नाही म्हणाली, आपलं वय काय, मला नाही बाबा नाचायचं तुम्ही पण बसा खाली...पण आजोबा कसे ऐकतात. त्यांनी ट्रेनमधील एका तरुणीला घेऊन डान्स (dances) करायला लागतात. आजी हे पाहून अवाक् होऊन जाते. मग काय आजीने पुढे जे केलं ते पाहून यूजर्स (users) हैराण झाले आहेत. (video viral grandfather grandmother dances On instagram nmp)
बघितलं आजी आजोबांना कशी भारी पडली ते...आजीनेही ट्रेनमधील एका तरुणासोबत डान्स करण्यास सुरुवात केली. या व्हिडीओमधील मजेशीर म्हणजे आजीने डान्स करण्यापूर्वी आजोबांना जसं चिडवलं ते बघून आपल्याला आपलं लहानपण आठवतं. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे.