UK Prime Minister : ब्रिटनला मिळणार नवीन पंतप्रधान; पाहा कोणाचा झाला विजय

भारतीय वंशाचे ऋषी सुनक आणि लिझ ट्रस यांच्यात अटीतटीची लढाई सुरु होती

Updated: Sep 5, 2022, 05:37 PM IST
UK Prime Minister : ब्रिटनला मिळणार नवीन पंतप्रधान; पाहा कोणाचा झाला विजय title=

ब्रिटनच्या नव्या पंतप्रधान (UK Prime Minister) म्हणून लिझ ट्रस (liz truss) यांची निवड झाली आहे. लिझ ट्रस यांनी भारतीय वंशाचे माजी अर्थमंत्री ऋषी सुनक (rishi sunak) यांचा चुरशीच्या लढतीत पराभव केला आहे. पहिल्या पाच फेऱ्यांमध्ये ऋषी सुनक यांनी मोठी आघाडी घेतली होती. परंतु कंझर्व्हेटिव्ह पक्षाच्या सदस्यांच्या अंतिम मतदानात लिझ ट्रस विजयी झाल्या.

या निवडणुकीत माजी पंतप्रधान बोरिस जॉन्सन (boris johnson) यांनी लिझ ट्रस यांना उघडपणे पाठिंबा दिला होता. त्यांनी पक्षाचे सदस्य आणि खासदारांना लिझ ट्रस यांना मतदान करण्यास सांगितले होतं. 

ऋषी सुनक यांच्या राजीनाम्यामुळेच त्यांना पंतप्रधानपदाची खुर्ची गमवावी लागली, असा आरोप बोरिस जॉन्सन यांनी केला आहे. लिझ ट्रस आता 7 सप्टेंबर रोजी पंतप्रधान म्हणून ब्रिटिश संसदेत उपस्थित राहणार आहेत.

त्यामुळे आता लिझ ट्रस ब्रिटनच्या नवीन पंतप्रधान असतील. ऋषी सुनक यांना मागे टाकून त्यांनी विजय मिळवला आहे आहे. शेवटच्या टप्प्यात लिझ ट्रस यांना 81 हजार 326 मते मिळाली. तर ऋषी सुनक यांना अवघी ६० हजार ३९९ मते मिळाली. तिसर्‍या म्हणजेच शेवटच्या टप्प्यात लिझ ट्रस ऋषी सुनक यांच्यापेक्षा खूप पुढे असल्याचे सर्वेक्षणात सांगण्यात आले.

भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 5 वाजता नवीन पंतप्रधानांच्या नावाची घोषणा करण्यात आली. बोरिस जॉन्सन यांच्या राजीनाम्यानंतर ब्रिटनमध्ये निवडणुका झाल्या. विशेष बाब म्हणजे ऋषी सुनक यांनी पाच फेऱ्यांमध्ये लिझ ट्रस यांना मागे टाकले होते. मात्र अंतिम फेरीत लिझ ट्रस यांनी बाजी मारली.