पाण्याच्या प्रवाहात अडकलेल्या कुत्र्याला मदत करायला गेला अन्..., पाहा Viral Video

हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. 

Updated: Sep 5, 2022, 02:20 PM IST
पाण्याच्या प्रवाहात अडकलेल्या कुत्र्याला मदत करायला गेला अन्..., पाहा Viral Video  title=

मुंबई : सोशल मीडियावर दररोज अनेक व्हीडिओ व्हायरल होत असतात. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत तरुणाने स्वत:च्या जीवाची बाजी लावत डॅममध्ये अडकलेल्या कुत्र्याचा जीव वाचवलाय. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला असून नेटकरी त्या तरुणाची स्तूती करत आहेत. 

आणखी वाचा : 'बाहुबली'साठी एस.एस.राजमौलींनी 'या' हॉलिवूड चित्रपटांचे सीन्स केले Copy? Video Viral

व्हायरल झालेल्या या व्हिडीओत एक कुत्रा डॅममध्ये असल्याचे दिसते. तो कुत्रा तिथे अडकल्याचं आपण पाहू शकतो. तर डॅमच्या बाहेरच्या बाजुला असलेले लोक त्याला पाहतात. त्या लोकांमधील एक मुलगा लगेच खाली जातो आणि त्या कुत्र्याचा जीव वाचवण्यासाठी गेलेल्या या तरुणाला त्याच्या जीवाला धोका आहे हे माहित असते. तो मुलगा त्या कुत्र्याला तर वाचवतो पण आता वर कसं जाणार हा प्रश्न त्याच्यासमोर येतो. तेवढ्यात तिथे उपस्थित असलेले लोक एकमेकांचा हात पकडतात आणि त्या मुलाला आणि कुत्र्याला वाचवतात.

आणखी वाचा : बाप्पाच्या दर्शनासाठी तोकडे कपडे घातले म्हणून..., सेलिब्रिटीसोबत मंडळानं केलं असं काही; पाहा Video

व्हायरल झालेला हा व्हिडीओ कोणत्या ठिकाणचा आहे हे अजून समोर आलेलं नाही. पण त्या व्हिडीओमुळे अनेकांना प्रोत्साहन मिळालं आहे. त्याचसोबत कोणतं ही काम करण्याचा विचार केला तरी आपण करु शकतो. 

आणखी वाचा : मद्यधुंद अवस्थेत पूनम पांडेकडून रेस्टॉरंटमध्ये तोडफोड, Viral Video पाहून कोणीही संतापेल

आणखी वाचा : 'एकनाथ शिंदेंसाठी काहीही करु शकतो'; चित्रपट दिग्दर्शकाची भावनिक पोस्ट

हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नेटकरी त्या मुलाचं आणि त्याला मदत केलेल्या लोकांचं कौतुक करत आहे. एक नेटकरी,म्हणाला ' हा व्हिडीओ पाहिल्यानंतर माझा मानवतेवर पुन्हा एकदा विश्वास बसला.' दुसरा नेटकरी म्हणाला,' देव त्यांना आशीर्वाद देओ.' तिसरा नेटकरी म्हणाला,' याला म्हणताता मानवता.' आणखी एक नेटकरी म्हणाला, 'कठीण काळात जर एकत्र काम केलं तर कोणत्याही मोठ्या अडचणीतूनही बाहेर पडू शकतो.'