Video : मेंदूच्या शस्त्रक्रियेदरम्यान स्वत:च व्हायोलिन वाजत होती वृद्ध महिला, व्हिडीओ पाहताच डोळ्यात पाणी

Viral Video : या व्हिडीओमधील महिलेचं धाडस पाहून नेटकरी अवाक् झाले आहेत. डॉक्टर या महिलेच्या मेंदूचं ऑपरेशन करत आहेत आणि ती महिला व्हायोलिन वाजत असल्याचं दिसून येतं आहे. 

नेहा चौधरी | Updated: Aug 2, 2023, 12:15 PM IST
Video : मेंदूच्या शस्त्रक्रियेदरम्यान स्वत:च व्हायोलिन वाजत होती वृद्ध महिला, व्हिडीओ पाहताच डोळ्यात पाणी title=
Trending News brain tumour surgery woman patient plays violin video viral on Social media watch now

Viral Video : ऑपरेशन थिएटरमधील एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. ऑपरेशन थिएटरचं नाव घेतलं की अंग थरथर कापतं. खरं तर हॉस्पिटलच्या पायाला चढायला प्रत्येकाला नकोस होतं. आजारपण आणि हॉस्पिटल म्हटलं तरी घाम फुटतो. अनेक जण तर हॉस्पिलटचं वातावरण तिथला तो औषधंचा वास या टेन्शने आपल्या जवळच्या व्यक्तीला बघायला देखील जात नाही. त्यात जर ऑपरेशन हा शब्द घेतला तरी आपण निशब्द होतो. 

ऑपरेशन थिएटरमधील वातावरण, ती शांतता, तिथे जाणवणारं टेन्शन सगळं नकोस होतं. अशावेळी आधार आणि नातेवाईक, डॉक्टर यांचा धीर हा महत्त्वाची भूमिका बजावतात. पण सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये एका मोठा आणि महत्त्वाच्या ऑपरेशनच्या वेळी ती स्वत:च व्हायलोलिन वाजवताना दिसून आली. तिचं धाडस पाहून नेटकरी अवाक् झाले आहेत. (Trending News brain tumour surgery woman patient plays violin video viral on Social media watch now)

धाडसी महिलेचं सर्वत्र कौतुक

ऑपरेशनच्या वेळी रुग्णांला बेशुद्ध केलं जातं. त्यानंतर त्यावर शस्त्रक्रिया केली जाते. पण या व्हिडीओमधील वृद्ध महिलेला ऑपरेशनच्या वेळी व्हायोलिन वाजत होती. आश्चर्यकारक म्हणजे तिचं साधसुध ऑपरेशन ही तर मेंदूची सर्जरी सुरु होती. 

तिच्या मेंदूतील बॅन ट्यूमर काढण्याची शस्त्रक्रिया केली जात होती. सर्व उपकरणांनी सज्ज असलेलं हे थिएटर, त्यात डॉक्टर गंभीर स्वरुपात त्या वृद्ध महिलेच्या मेंदूचे ऑपरेशन करत आहेत. या महिला निर्भयपणे व्हायोलिन वाजवत होती. ऑपरेशनवेळी ही महिला व्हायोलिनच्या संगीतात पूर्णपणे तल्लीन झालेली दिसून येतं होती. विशेष म्हणजे अशा प्रकारच्या सर्जरी या 8 ते 10 तास चालतात. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Violinahead (@violinahead)

हा व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवरील violinahead या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. आतापर्यंत 1 लाख 92 हजारांहून अधिक लोकांनी हा व्हिडीओला पसंती दिली आहे. यापूर्वीही गेल्या वर्षी असाच एक व्हिडीओ समोर आला होता. 

हेसुध्दा वाचा - Trending Video : अबब! असा करिश्मा कधी पाहिला आहे का? 9 तास ऑपरेशनदरम्यान रुग्ण वाजवत होता सॅक्सोफोन

ज्यामध्ये एका संगीतकाराच्या (Musician) ब्रेन ट्युमर (Brain Tumor ) सर्जरीच्या वेळी तो सॅक्सोफोन (Saxophone) वाजत होता. रुग्णाचं हे धाडस पाहून प्रत्येक जण आश्चर्यचकित होतं आहेत.