बेडवर मोबाईल चार्जिंगला लावून निवांत झोपली, पुढे जे घडलं ते हादरवणारं

मोबाईल चार्जिंग करावा म्हणून एका मुलीने बेडवर प्लगला मोबाईल चार्जिंगला लावला आणि तिचा मृत्यू झाला. या घटनेमुळे सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.

Updated: Jul 30, 2022, 09:25 PM IST
बेडवर मोबाईल चार्जिंगला लावून निवांत झोपली, पुढे जे घडलं ते हादरवणारं title=

मुंबई : एक 17 वर्षांची मुलगी तिचा मोबाईल चार्जिंगला लावून झोपली होती. यामुळे तिला इलेक्ट्रिक शॉक लागला आणि मोबाईल चार्जिंगला लावून झोपणं तिच्या मृत्यूचं कारण बनलं. मुलीच्या मृत्यूमुळे फोन चार्जिंगच्या सुरक्षेबाबत सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर वाद-विवाद होत आहेत.

'द मिरर' च्या रिपोर्ट नुसार, ही घटना कंबोडियामध्ये घडली आहे. कंबोडियाच्या क्रेटी प्रांतमध्ये 17 वर्षांची एक मुलगी तिचा मोबाईल चार्जिंगला लावून त्यावर झोपली आणि तिचा मृत्यू झाला. ती मुलगा एका गोल्ड माइनिंग कंपनीमध्ये चीनी भाषेची ट्रान्सलेटर म्हणून काम करत होती.

असं सांगितलं जातंय की ती मुलगी अंघोळ करुन बेडवर झोपली होती. तिने त्याच बेडवर वीजेच्या प्लगला मोबाईल चार्जिंगला लावला होता. तेव्हा तिच्या मोबाईलचा टॉर्च ऑन ठेवला होता. मोबाईल चार्जिंग लावून ती जेव्हा झोपली तेव्हा तिला वीजेचा झटका लागला आणि तिचा मृत्यू झाला.

या प्रकरणासंबंधी स्थानिक अधिकाऱ्यांनी सांगितलं की, 27 जुलैला करंट लागल्यामुळे त्या मुलीचा झोपीतच मृत्यू झाला. करंट लागण्याआधी तिने शॉवर घेतलं होतं. तिच्या बेडवरच प्लग ठेवलेला होता आणि त्याच प्लगला तिने मोबाईल चार्जिंगला लावला होता. या घटनेनंतर देशात फोन चार्जरच्या बाबतीत वाद-विवाद सुरु झाला. सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत.

एका यूजर्सने असं लिहिलं की- वीजेपासून स्वत:ला वाचवायचं असेल तर या विषयी जागृती अभियान चालवायला हवं. 

दुसऱ्या यूजर्सने असं लिहिलं की- या प्रकारच्या दुर्घटना नेहमी होत आहेत.

तिसऱ्या यूजर्सने असं लिहिलंय की- या घटनेमुळे मोबाईल चार्जर्सच्या क्वालिटीवर प्रश्नचिन्ह निर्माण होतोय. 

तसेच, काही यूजर्सनी इलेक्ट्रिक प्लगच्या गुणवत्तेबाबतही प्रश्न उपस्थित केले.