नवी दिल्ली : डेनमार्कमधील कोपाहेगन शहरातून जगातील सर्वात महागडी वोडकाची बाटली चोरी झाली आहे. या वोडकाच्या बाटलीची किंमत ऐकली तर तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल.
RT.Com ने दिलेल्या वृत्तानुसार, मंगळवारी रात्री कॅफे ३३ मधून ही वोडकाची बाटली चोरी झाली आहे. या बाटलीची किंमत तब्बल ९ कोटी रुपये असल्याचं बोललं जात आहे.
चोरी झालेल्या वोडकाच्या बाटलीवर ही सोनं आणि चांदीचा वापर केला होता. मिळालेल्या माहितीनुसार, वोडकाच्या बाटलीवर ३ किलो सोनं आणि ३ किलो चांदीचा वापर करुन तयार करण्यात आली होती.
या वोडकाच्या बाटलीचा वापर हा टीव्ही सीरिज 'हाऊस ऑफ कार्ड्स' मध्येही करण्यात आला होता.
RT.Com ला बार मालक इंगबर्ग यांनी सांगितले की, म्युझियम बंद असताना एका व्यक्तीने आतमध्ये शिरण्याचा प्रयत्न केला. कम्पाऊंडवरुन उडी मारुन तो इथपर्यंत पोहोचला होता.
वोडका म्युझियमने फेसबुकवर एक फोटो प्रसिद्ध केला आहे. ज्यामध्ये चेहऱ्यावर मुखवटा लावलेला व्यक्ती चोरी करताना दिसत आहे.
बार मालकाने सांगितले की, या घटनेमुळे मी खूपच दु:खी आणि नाराज आहे. ही बाटली इतरांच्या तुलनेत खूपच खास होती. माझ्याकडे एकूण १२०० दारुच्या बाटल्या आहेत आणि त्यापैकी सर्वात स्पेशल ही बाटली होती.