येरुशलमधील संघर्षाचे युद्धात परिवर्तन; पॅलेस्टाईनच्या हल्ल्यात भारतीय महिलेचा मृत्यू

येरुशलमच्या अल आक्सा मशिदीत शुक्रवारी नमाजपठणादरम्यान झालेल्या संघर्ष आता युद्धाचे स्वरुप घेत आहे

Updated: May 12, 2021, 09:18 AM IST
येरुशलमधील संघर्षाचे युद्धात परिवर्तन; पॅलेस्टाईनच्या हल्ल्यात भारतीय महिलेचा मृत्यू title=

गाजापट्टी : येरुशलमच्या अल आक्सा मशिदीत शुक्रवारी नमाजपठणादरम्यान संघर्ष आता युद्धाचे स्वरुप घेत आहे. पॅलेस्टाईन आणि इस्त्राईलमध्ये युद्धसदृष्य स्थिती तयार झाली आहे. दोन्ही बाजूने एकमेकांवर रॉकेट डागले जात आहे. या हल्ल्यांमध्ये एका भारतीय महिलेचादेखील मृत्यू झाला आहे. इस्त्राईलच्या हल्ल्यानंतर 28 जणांचा मृत्यू झाला आहे. इस्त्राईलच्या सैन्याचे म्हणणे आहे की, हल्ल्यांमध्ये कमीत कमी 16 अतिरेकी मारले गेले आहेत.

केरळच्या सौम्याचा मृत्यू

इस्त्राईलच्या सैन्याचे प्रवक्ते जोनाथन कोनरिकस यांच्या मते, हमासने दोनशे रॉकेट डागले आहे. त्यातील एक रॉकेट अश्कलोन शहरातील इमारतीवर पडले. या हल्ल्यात केरळची सौम्या संतोष यांचा मृत्यू झाला आहे. सौम्या 80 वर्षीय इस्त्राईली महिलेची केअर टेकर होती.

हमासच्या रॉकेट हल्ल्यात जीव गमवलेली सौम्या त्यावेळी पती संतोषशी व्हिडिओ कॉलद्वारे बोलत होती. तेवढ्यात जोरदार स्पोट होत, कॉल बंद झाला. त्यानंतर कुटूंबियांनी माहिती घेतल्यावर हमासच्या हल्ल्यात सौम्याचा मृत्यू झाल्याचे कळले.

गाजापट्टीवर हल्ले आणखी तीव्र होणार

सध्या सुरू असलेल्या संघर्षामध्य़े इस्त्राईलच्या नागरिकाचा मृत्यू होण्याची ही पहिलीच घटना आहे. इस्त्राईलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी गाजापट्टीवर हल्ले तीव्र करण्याचे संकेत दिले आहेत.