या देशाच्या पंतप्रधानांचा सेक्स व्हिडिओ व्हायरल, टीकेनंतर दिला पदाचा राजीनामा

उत्तर सायप्रसचे पंतप्रधान इरसान सानेर यांच्या एका व्हिडिओमुळे देशात राजकीय खळबळ उडाली आहे. व्हिडिओ समोर आल्यानंतर पंतप्रधान सानेर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. एरसन सानेर यांनी आरोप केला आहे की हा व्हिडिओ त्यांना बदनाम करण्याचे षडयंत्र आहे आणि माफियांच्या सांगण्यावरून तो लीक झाला आहे.

Updated: Oct 22, 2021, 08:30 PM IST
या देशाच्या पंतप्रधानांचा सेक्स व्हिडिओ व्हायरल, टीकेनंतर दिला पदाचा राजीनामा title=

निकोसिया : उत्तर सायप्रसचे पंतप्रधान इरसान सानेर यांच्या एका व्हिडिओमुळे देशात राजकीय खळबळ उडाली आहे. व्हिडिओ समोर आल्यानंतर पंतप्रधान सानेर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. एरसन सानेर यांनी आरोप केला आहे की हा व्हिडिओ त्यांना बदनाम करण्याचे षडयंत्र आहे आणि माफियांच्या सांगण्यावरून तो लीक झाला आहे.

एरसन सानेर राजकीय दबावाखाली

एरसन सानेर असेही म्हणाले कीस, व्हिडिओमध्ये दाखवलेली व्यक्ती इतर कोणी आहे, मी नाही. 54 वर्षीय सानेर, दोन मुलांचे वडील आहे. गेल्या अनेक दिवसांपासून राजकीय दबावाला बळी पडले होते. त्यांचा स्वतःचा पक्ष राष्ट्रीय एकता पक्षाने (UBP) सरकारचा पाठिंबा काढून घेतला. मात्र, तरीही ते सरकारमध्ये राहिले. निवडणुकीनंतर ते पुन्हा पंतप्रधान बनण्याचा विचार करत होते, परंतु आक्षेपार्ह व्हिडिओ समोर आल्यानंतर त्यांच्या प्रतिमेला मोठा धक्का बसला आहे.

या व्हायरल व्हिडिओमध्ये, 20 वर्षीय मुलगी दिसत आहे. मात्र, सानेर हा व्हिडिओ बनावट असल्याचे सांगत आहेत. माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, हा व्हिडिओ माझा नाही. कोणीतरी मला माझ्या प्रिय देशाची, माझ्या पक्षाची सेवा करण्यापासून रोखू इच्छित आहे, परंतु ते राजकीय मार्गांनी नव्हे तर वैयक्तिक हल्ल्यांद्वारे असे करतात. हे एक षडयंत्र आहे.

तुर्की माफियांवर आरोप करत एरसन सानेर म्हणाले की हा केवळ माझ्यावरच नाही तर माझ्या कुटुंबावर, माझ्या पक्षावर आणि आमच्या राजकीय संस्थांवर हल्ला आहे, म्हणून आम्ही आमच्या कायदेशीर सल्लागारांसोबत बैठक घेत आहोत. मंगळवारी एका तुर्की पत्रकाराने हा व्हिडिओ प्रथम ट्विटरवर पोस्ट केला होता. त्यानंतर तो व्हायरल झाला. व्हिडिओ समोर येताच पंतप्रधानांवर टीका झाली. त्यानंतर त्यांनी पदाचा राजीनामा दिला.