तालिबानकडून शत्रू राष्ट्राला चुकून मोठी रक्कम ऑनलाईन ट्रान्सफर...पैसे परत मागितले तर उत्तर आलं....

हिंदीत एक म्हण आहे, ''अकल बडी या भैस'', तशीच परिस्थिती तालिबानची झाली आहे, नेहमीच AK47 चा धाक दाखवून कामं करणाऱ्या तालिबानला 

Updated: Dec 23, 2021, 05:46 PM IST
तालिबानकडून शत्रू राष्ट्राला चुकून मोठी रक्कम ऑनलाईन ट्रान्सफर...पैसे परत मागितले तर उत्तर आलं.... title=

काबूल : अफगाणिस्तानातील तालिबान सरकारवर आर्थिक आणीबाणी आल्यासारखी परिस्थिती आहे, पई पईची तालिबान जमवाजमव करतोय. हिंदीत एक म्हण आहे, ''अकल बडी या भैस'', तशीच परिस्थिती तालिबानची झाली आहे, नेहमीच AK47 चा धाक दाखवून कामं करणाऱ्या तालिबानला मोठा आर्थिक फटका बसल्याने, आता दुष्काळात तेरावा महिना अशी परिस्थिती झाली आहे.

कारण अफगाणिस्तानमधील तालिबान सरकारच्या दुतावासाने तब्बल ८० लाख डॉलर ट्रान्सफर केले, पण ते गेले शत्रू राष्ट्राला, हा ऑनलाईन व्यवहार चुकून झाला. या देशाकडून तालिबानने पैसा परत मागितला, पण त्या देशाने उत्तर दिलं, ''पैसे अजिबात परत मिळणार नाहीत आणि यापुढे पैसे परत मागायचेही नाहीत''. आधीच कंगाल असलेल्या तालिबान सरकारला आणखी कंगालपती झाल्याचा अनुभव येतोय.

तालिबान सतत आपल्या शेजारी आणि बलाढ्य राष्ट्रांकडे आपले बँक खाती जी गोठवली आहेत, ती खुली करण्याची मागणी करत आहे. खुद्द पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान, तालिबानसाठी ब्रॅण्ड एम्बेसेडरबनून इतर देशाकडून वर्गणी मागत आहेत.

अफगाण दुतावासातून शत्रू राष्ट्राला 8000000 डॉलर

तालिबानने चुकून ज्या देशाला एवढी रक्कम पाठवली आहे, तो देश आहे तालिबानचाच शत्रू, ताजिकिस्तान. अफगाण दुतावासाने चुकून ताजिकिस्तानच्या बँक अकाऊंटमध्ये ८० लाख डॉलर जमा केले आहेत.

तालिबानला चूक समजल्यावर त्यांनी ताजिक सरकारकडे पैसे परत मागितले. ही मागणी ताजिकिस्तानने लगेच फेटाळून लावली आहे.

तालिबानने पत्र लिहून पैसे परत मागितले...

तालिबान सरकारने नोव्हेंबरमध्ये ताजिकिस्तानला पत्र लिहून पैसे परत करण्याविषयी सांगितलं होतं, मात्र तालिबानची ही विनंती अमान्य करण्यात आली आहे.