'स्क्विड गेम 2' पहिला टीझर प्रेक्षकांच्या भेटीला... 'या' दिवशी सुरू होणार धडकी भरवणारा खेळ

Squid Game 2 Release: स्क्विड गेमचा दुसरा भाग आता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. याची घोषणा नुकतीच झाली आहे. या सिरिजचा टिझर प्रदर्शित झाला आहे. हा टीझर सध्या सगळीकडेच व्हायरल होतो आहे. 

गायत्री हसबनीस | Updated: Jun 19, 2023, 02:24 PM IST
'स्क्विड गेम 2' पहिला टीझर प्रेक्षकांच्या भेटीला... 'या' दिवशी सुरू होणार धडकी भरवणारा खेळ title=
June 19, 2023 | Squid Game season 2 is set release soon on ott teaser goes viral (Photo: Netfix Instagram)

Squid Game 2 Release: सध्या ओटीटीचा जमाना आहे त्यामुळे तरूणपिढीसाठी नवंनव्या वेबसिरिज कधी येतात याची वाट पाहण्यातच कोण उत्सुकता असते. डिजिटलमुळे सगळंच इतकं जवळं आलं आहे की विविध देशातील कथा या ग्लोबल स्तरावर तरूणाईला आवडताना दिसत आहेत. आज कोरियन वेबसिरिज आणि जॉनर्स प्रेक्षकांना आवडत आहेत. त्यातील दोन वर्षांपुर्वी सर्वात गाजलेली वेबसिरिज म्हणजे 'स्विक्ड गेम' ही. स्विक्ड गेमचा दुसरा सिझन आता लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून पुढच्या वर्षी म्हणजेच 2024 मध्ये हा सिरिज प्रेक्षकांच्या भेटीला येऊ शकते. त्यासंदर्भातील घोषणा सध्या करण्यात आली आहे. 

'नेटफ्लिक्स'च्या ऑफिशियल इन्टाग्राम अकांऊटवरून या सिरिजच्या दुसऱ्या सिझनचा टीझर प्रदर्शित केला आहे. त्यामुळे आता प्रेक्षकांची उत्सुकता वाढली आहे. यावेळी हा टीझर प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतो आहे. या व्हिडीओ तुम्ही पाहू शकता की रेड लाईट आणि ग्रीन लाईट ही दोनं बटणं दिसतात आणि समोर एक माणूस येताना दिसतो. काल या सिरिजचा टीझर प्रदर्शित झाला आहे. हा टीझर प्रदर्शित झाल्या झाल्या या व्हिडीओला प्रेक्षकांचा तूफान प्रतिसाद आल्याचा दिसतो आहे. सोबतच हा टीझर सगळीकडेच चांगलाच व्हायरल झाला आहे. 

.या सिरिजचा दुसरा भाग येणार याची घोषणा कधीच झाली होती. पण तो कधी येणार याबद्दल सगळेच साशंक होते. 111 मिलियन व्हूज आलेली अर्थातच सर्वाधिक पाहिली गेलेली ही जगातील सर्वाधिक लोकप्रिय सिरिज आहे. 94 देशांपैकी पहिल्या 10 देशांमध्ये सर्वाधिक पाहिली जाणारी ही वेबसिरिज होती. ती येत्या काही वर्षात येणारच याबद्दल मात्र खात्री होती. असे विषय हे तरूणांच्या आवडीचे ठरत आहेत तेव्हा त्यामुळे तरूणीपिढीचे लायकींग किती बदलते आहे याची प्रतिचिती येते आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

ही सिरिज नऊ भागांची आहे. हा चित्रपट कर्जबाराजी मंडळींच्या आयुष्यावर भाष्य करणारी सिरिज आहे. लोकांना जेव्हा पैशांचे आमिष दाखवले जाते त्यावेळी त्यांची काय गत होते यावर ही सिरिज बेतली आहे. अशाच एका खेळात या लोकांना पैशांचे आमिष दाखवले जाते. या खेळात त्यांना ओढल्यानंतर एकेकांना त्यातून मारण्यात येते.

हा खेळ जिंकलेल्या व्यक्तीला 38.7 मिलियन डॉलर मिळतील असे सांगितले जाते. त्यातून आता ही दुसरी सिरिज नक्की कशावर असेल? त्याचसोबत या नव्या सिरिजमध्ये काय वेगळं असेल? का पुढील भागात मागच्याच भागाचे पुढील चित्रिकरण असेल यावर नाना तऱ्हेचे तर्कवितर्क काढले जात आहेत. ह्वांग डोंग-ह्युक हे या सिरिजचे दिग्दर्शन करणार आहे. यिम सी-वान, कांग हा-नेउल, पार्क सुंग-हून आणि यांग डोंग-जौन हे या सिरिजमध्ये दिसणार आहेत.