‘ख्रिसमस ट्री’बद्दल या गोष्टी तुम्हाला माहित आहेत का?

ख्रिसमस अगदी चार दिवसांवर येऊन ठेपलाय.

Darshana Pawar Darshana Pawar | Updated: Dec 22, 2017, 02:54 PM IST
‘ख्रिसमस ट्री’बद्दल या गोष्टी तुम्हाला माहित आहेत का? title=

नवी दिल्ली : ख्रिसमस अगदी चार दिवसांवर येऊन ठेपलाय. आता तुझं-माझं न करता आपण सारेच त्याच्या सेलिब्रेशनमध्ये आवर्जून सहभागी होतो. ख्रिसमसचा उत्साह, आनंद सारं काही आपल्याला सुखावतं. ऑफीस सजवले जातात. सिक्रेट सांता सारखे गेम्स खेळले जातात. वातावरणात आपसुकचं एक उत्साह येतो. हा सण तर आपण साजरा करतो. पण या ‘ख्रिसमस ट्री’बद्दल अनेकांना माहिती नसेल. तर या जाणून घेऊया ‘ख्रिसमस ट्री’बद्दल....

 ‘ख्रिसमस ट्री’ ची शेती

ख्रिसमस साजरा करताना‘ख्रिसमस ट्री’उभारून तो विविध प्रकारच्या रंगीबेरंगी वस्तूंनी सजवला जातो. स्वाभाविकच या दिवसात‘ख्रिसमस ट्री’ला खूप मागणी असते. कृत्रिम ‘ख्रिसमस ट्री’ हल्ली सर्वत्र उपलब्ध असतात. तरी खऱ्या ‘ख्रिसमस ट्री’ ला मोठी मागणी असते. म्हणून युरोप, अमेरिकेत याची शेती केली जाते.

 ‘ख्रिसमस ट्री’ बद्दल...

स्कॉट पाईन, फर, नॉर्डमन फर, स्प्रूस अशा अनेक प्रकारच्या झाडांची शेती केली जाते. ही झाडे वर्षाला ३० सेंटीमीटर इतकी वाढतात. ठराविक उंची झाली की मग कापणी करून त्यांची विक्री करण्यात येते. झाडे दीड ते दोन वर्षांची झाली की त्यांची कापणी करतात किंवा काही झाडे पाच सहा वर्ष वाढवली जातात. झाडे जितकी मोठई तितकी त्यांची किंमतही जास्त असते.

‘ख्रिसमस ट्री’ ला मोठी मागणी

१ डिसेंबरला ‘ख्रिसमस ट्री’ची कापणी करून विविध देशात त्यांची निर्यात केली जाते. दरवर्षी ८० लाखाहून अधिक खऱ्या ‘ख्रिसमस ट्री’ ची युरोपात विक्री होते.